Honda Livo Saam Tv
लाईफस्टाईल

Honda Livo: 60 Kmpl चा जबरदस्त मायलेज; किंमत 80 हजारपेक्षा कमी; जाणून घ्या कशी आहे Honda ची 'ही' स्मार्ट बाईक

Satish Kengar

Honda Livo:

कमी किमतीच्या हाय मायलेज बाईकला भारतीय बाजारात मागणी आहे. यातीलच Honda ची Livo नावाची बाईक आहे. ही बाईक ताशी 110 किमीचा टॉप स्पीड देते. बाईकमध्ये 9 लिटरची इंधन टाकी आहे. Honda Livo ची प्रारंभिक किंमत 78500 हजार रुपये एक्स-शोरूम आहे. ही बाईक 60 kmpl चा मायलेज देते. आरामदायी राइड देण्यासाठी बाईकला सिंगल सीट देण्यात आली आहे. याच बाईकबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...

बाइकचे एकूण वजन 113 किलो

Honda Livo मध्ये डिस्क आणि ड्रम ब्रेकचा पर्याय देण्यात आला आहे. या बाईकची पॉवर 8.79 PS आहे. याचे टॉप मॉडेल 82500 हजार रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध आहे. बाईकचे एकूण वजन 113 किलो आहे, ज्यामुळे रस्त्यावर चालणे सोपे होते. बाईक 9.30 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. ही एक हाय एंड बाईक आहे, जी खराब रस्त्यांवर सहज राइड करता येते. अलीकडेच याचे नवीन मॉडेल सादर करण्यात आले आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ड्युअल टोन रंग पर्याय

नवीन मॉडेलमध्ये बाईकवर ग्राफिक्स उपलब्ध आहेत. यात 3D लोगो आहे. Honda Livo मध्ये देखील ड्युअल टोन रंगाचा पर्याय आहे. यामध्ये कार्बन फायबरचा वापर करण्यात आला आहे. या स्टायलिश बाईकमध्ये 18 इंच ट्यूबलेस टायर आहेत. बाईकमध्ये किक स्टार्टचा पर्याय उपलब्ध आहे. होंडा लिवोमध्ये शार्प हेडलॅम्प काउल्ससह स्पोर्टी बॉडीवर्क आहे.

सिंगल सिलेंडर एअर कूल्ड इंजिन

Honda Livo मध्ये सिंगल सिलेंडर एअर कूल्ड इंजिन आहे. बाईकमध्ये स्पीडोमीटर, हॅलोजन लाइटसह अॅनालॉग लेआउट आहे. बाईकवरील इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये Fuel गेज, ओडोमीटर आणि ट्रिपमीटर आहेत. बाईकमध्ये 4 स्पीड ट्रान्समिशन आहे. (Latest Marathi News)

यात Combine ब्रेकिंग सिस्टम आहे. बाईकमध्ये डिजिटल इनसेट उपलब्ध आहे. ही बाईक सायलेंट स्टार्टसह, ज्यामुळे दुचाकी कमी आवाज करते. ही बाजारात TVS Star City Plus आणि Hero Passion Pro 110 शी स्पर्धा करते. बाईकमध्ये टेलीस्कोपिक फ्रंट फोर्क आणि इंजिन किल स्विचसह ट्विन रिअर शॉक अॅब्जॉर्बर्स आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

Maharashtra News Live Updates: राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! बँकेच्या कर्मचाऱ्यांना आजीवन मिळणार १०००० रुपये पेन्शन

SCROLL FOR NEXT