Home Gardening Ideas Saam Digital
लाईफस्टाईल

Home Gardening Ideas : बाल्कनीतील झाडांची जोपासना कशी कराल? आयुर्वेद, जीवनशैलीवर तज्ज्ञ मंडळी करणार मार्गदर्शन

Home Gardening Ideas : मियावाकी पद्धतीने वृक्षलागवड, व्हर्टिकल गार्डनिंग, किचन गार्डनिंग व बाल्कनीतील झाडांची जोपासना यासंबंधी ९ ते ११ फेब्रुवारी रोजी दोनदिवसीय कार्यशाळेचे आयोजन भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात करण्यात आले आहे.

Sandeep Gawade

Home Gardening Ideas

मियावाकी पद्धतीने वृक्षलागवड, व्हर्टिकल गार्डनिंग, किचन गार्डनिंग व बाल्कनीतील झाडांची जोपासना यासंबंधी ९ ते ११ फेब्रुवारी रोजी दोनदिवसीय कार्यशाळेचे आयोजन भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात करण्यात आले आहे. आयुर्वेद आणि जीवनशैली आदी विषयांवर प्राध्यापक, तज्ज्ञ मंडळी आपले अनुभव मांडणार आहेत. पर्यावरणाचे महत्त्व, झाडांची जोपासना याविषयी आवड असलेल्यांसाठी कार्यशाळा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

या कार्यशाळेत सहभागी होणाऱ्यांना पालिकेद्वारे प्रशस्तिपत्र देण्यात येणार आहे. या संधीचा फायदा जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन पालिकेच्या उद्यान विभागाचे अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी केले. दरम्यान, राणीच्या बागेतील प्रदर्शनाला विविध वृक्षप्रेमी, विद्यार्थी, बॉलीवूडमधील अभिनेते व इतर क्षेत्रातील मान्यवर तसेच १.५ लाख मुंबईकरांनी भेट दिली. निसर्गाच्या विविधतेचा मनमुराद आनंद लुटला. तरुणाईद्वारे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फोटो व रीलदेखील काढले गेले. याच पुष्पोत्सवाचा दुसरा अंक ‘उद्यान विद्याविषयक कार्यशाळा’ आहे. याचे आयोजन ९ ते ११ फेब्रुवारीपर्यंत वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय येथील ३-डी सभागृहात होणार आहे.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

एक हजार रुपये शुल्क

मुंबईतील नागरिकांना झाडांचे, पर्यावरणाचे महत्त्व समजावे व जागरूकता निर्माण व्हावी, हा या कार्यशाळेचा हेतू आहे. यासाठी एक हजार रुपये इतके शुल्क आकारले जाणार आहे.

नोंदणीसाठी येथे संपर्क

नोंदणीसाठी नागरिकांनी राणी बागेतील कार्यालयात संपर्क साधवा; अथवा उद्यान खात्याचे सहायक उद्यान अधीक्षक अमित करंदीकर (मोबाईल क्रमांक ९३२३१६३६२२) व उद्यान विद्या सहायक प्रतिभा ठाकरे (मोबाईल क्रमांक ८६९२०३०६९९) यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंची विकेट पडली; आता नंदुरबारचा पालकमंत्री कोण? या ५ मंत्र्यांची नावं चर्चेत

पंढरपुरातील विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज; वज्रलेपासाठी परवानगी रखडली|VIDEO

एक कॅप्सूल, पाण्याचं पेट्रोल? पेट्रोलसाठी पंपावर जाण्याची गरज नाही?

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंचं काय होणार? कोकाटे वादाच्या चक्रव्युहात?

Maharashtra Live News Update: वाशिम शहरातील गणेश पेठ येथे घराला अचानक आग

SCROLL FOR NEXT