मराठा समाजावर होणाऱ्या अन्यायाची आणि भेदभावाची होळी SaamTvNews
लाईफस्टाईल

मराठा समाजावर होणाऱ्या अन्यायाची आणि भेदभावाची होळी

सांगली मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाज यांच्या वतीने होळीचे आयोजन

विजय पाटील साम टीव्ही सांगली

सांगली : सांगली मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोर मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाज यांच्या वतीने मराठा समाजावर होणाऱ्या अन्यायाची आणि भेदभावाची होळी करण्यात आली. यावेळी सताधारी आणि विरोधक यांनी मराठा समाजाच्या प्रश्नाबाबत गंभीर होऊन मराठ्याना न्याय न दिल्यास मराठा समाजाची एकी पुन्हा या राज्यात दाखवून देऊ असा संकल्प यावेळी सर्व सहभागी समन्वयक यांनी केला.

हे देखील पहा :

समांतर आरक्षणामध्ये महिलांवरील अन्याय असतील तसेच शैक्षणिक प्रवेश व शासकीय नोकरी मध्ये खुल्या प्रवर्गात होणारे इतरांचे अतिक्रमण, अण्णासाहेब पाटील महामंडळास मिळणारा अपुरा निधी व यामुळे व्याज परतावा करण्यास होणारी दिरंगाई व नवीन थांबलेली कर्ज प्रकरण यातून होणारा अन्याय, सारथी संस्थेच्या वतीने नवनवीन योजना बनवण्यासाठी होणारी दिरंगाई व नुकत्याच झालेल्या अर्थ संकल्पीय अधिवेशनात निधी वाटपात झालेल्या भेदभावाचा आणि मराठा आरक्षणाला होणाऱ्या विरोधाची होळी करण्यात आली.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुकाराम मुंढे यांचा सिया गोयलच्या वडिलांना दणका; पुण्यातील दुकानावर FDA ची मोठी कारवाई

ZP ची बनावट कागदपत्रं बनवून उभारली इमारत; शिंदे गटाच्या दोन नेत्यांना अटक

Sharad Pawar : महायुतीत चौथा भिडू येणार? पवारांच्या एन्ट्रीनं शिंदेंचं टेन्शन वाढणार?

जयंत पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, डिलिमिटेशनसाठी पवार एनडीएसोबत? दिग्गज नेत्याचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics: आमदार-नगरसेवक वाचवण्यासाठी धावाधाव; ठाकरे सेनेकडून डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न

SCROLL FOR NEXT