High blood pressure saam tv
लाईफस्टाईल

High Blood Pressure: BP वाढला की लगेच औषधं घ्यायची का? डॉक्टरांनी सांगितला योग्य नियम

High BP Treatment: उच्च रक्तदाबामुळे हार्ट, मेंदू, किडनी आणि डोळ्यांवर गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे बीपीकडे दुर्लक्ष करू नये.

Sakshi Sunil Jadhav

बदलत्या लाइफस्टाइलमुळे कमी वयातच अनेकांना गंभीर आजारांना सामोरं जावं लागतं. पण काही आजार वेळीच ओळखून त्यावर उपचार केले नाहीत तर भविष्यात मोठ्या संकटांना सामोरं जावं लागतं. त्यात सध्या तरुणांमध्येही ब्लड प्रेशरचा धोका जास्त प्रमाणात वाढल्याचं चित्र दिसत आहे.

विशेष म्हणजे, या आजाराची लक्षणं सुरुवातीलाच दिसतात. त्यामुळे अनेकांना आपल्याला बीपी आहे हेही समजत नाही. काही जण बीपीची औषधं घेणं टाळतात. पण वेळेवर उपचार न केल्याने हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि किडनीचे आजार होण्याचा धोका वाढू शकतो. मग बीपीची औषधं नेकमी कधी सुरू करायची? याबद्दल महत्त्वाची माहिती जाणून घेऊया.

बीपीची औषधं सुरू करणं का महत्त्वाचं आहे?

हाय ब्लडप्रेशर रक्तवाहिन्यांवर सारखा दबाव पडतो. याचा परिणाम हृदय, मेंदू, किडनी आणि डोळ्यांवर होऊ शकतो. सुरुवातीला कोणताही त्रास जाणवत नसला तरी जास्तवेळ बीपी नियंत्रणात राहिली नाही तर गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे पुढच्या आजारांचा धोका वाढतो.

हार्ट अटॅक

ब्रेन स्ट्रोक

हार्ट फेल्युअर

किडनीचे आजार

दृष्टीसंबंधित समस्या

पायांच्या रक्तवाहिन्यांचे आजार

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) माहितीनुसार, हाय ब्लड प्रेशरचा हा हृदयविकार आणि अकाली मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे.

बीपीची औषधं नेमकी कधी सुरू करावीत?

डॉ. भाट यांच्या मते, बीपीची औषधं सुरू करण्याचा निर्णय फक्त एका रीडिंगवर घेतला जात नाही. त्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी तपासल्या जातात.

1. बीपीची सरासरी पातळी: बऱ्याचदा तपासणी केल्यानंतरही रक्तदाब वाढलेला असल्यावर डॉक्टर औषधांचा योग्य सल्ला देतात.

2. हार्ट अटॅकचा धोका: हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचा धोका जास्त असेल तर औषधोपचार लवकर सुरू करण्याची गरज भासू शकते.

3. वय आणि आरोग्यस्थिती: व्यक्तीचे वय, इतर आजार आणि एकूण आरोग्य लक्षात घेऊन उपचार ठरवले जातात.

4. किडनी आणि हृदयावर परिणाम: उच्च रक्तदाबामुळे आधीच अवयवांवर परिणाम झाला असल्यास औषधोपचार महत्त्वाचे ठरतात.

औषधांसोबत जीवनशैलीतही करा बदल

बीपी नियंत्रणात ठेवण्यासाठी फक्त औषधांवर अवलंबून राहू नका. आहारात मीठाचं प्रमाण कमी करा, वजन नियंत्रणात ठेवा आणि नियमित व्यायाम करा. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बीपीची नियमित तपासणी करा.

डिस्क्लेमर: ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे शहरातील गुरुवारची पाणीकपात रद्द

Bigg Boss 20: स्‍काउट OPला बिग बॉसने दिली मोठी शिक्षा; संपूर्ण सीझनसाठी केलं नॉमिनेट, कधीही होऊ शकतो घराबाहेर!

Corona Virus : कोरोनाचा नवा व्हेरियंट! PJ.2.1 मुळे पुन्हा धडकी; काय आहेत लक्षण? जाणून घ्या

Cleaning Hacks : घरातील कचऱ्याच्या डब्यातून दुर्गंध येतोय का? हे ५ सोपे उपाय नक्की करुन बघा

Indian Railways : ट्रेनच्या खिडकीला काच असूनही लोखंडी जाळी का असते? ९०% लोकांना माहीत नाही यामागचं कारण

SCROLL FOR NEXT