High Blood Pressure Saam tv
लाईफस्टाईल

High Blood Pressure : अचानक बीपी वाढल्यानंतर दिसतात ही लक्षणे, चुकूनही दुर्लक्ष करु नका; अन्यथा...

High Blood Pressure Causes : उच्च रक्तदाबामुळे बरेचा दृष्टीवर परिणाम होतो. अनेकवेळा माणसाला नीट दिसत नाही. त्यावेळी त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

कोमल दामुद्रे

High Blood Pressure Symptoms :

चुकीच्या जीवनशैलीमुळे हल्ली अनेक लोक उच्च रक्तदाबाच्या समस्येला बळी पडताना दिसून येत आहे. दिवसेंदिवस हा आजार वाढता दिसून येत आहे. पूर्वी हा आजार वयोवृद्धांमध्ये दिसून यायचा. मात्र सध्या या आजाराचा त्रास तरुणांनाही होत आहे.

अनेक वेळा लोक हाय बीपीचे शिकार होताना दिसून येत आहे. मात्र या आजाराची लक्षणे कोणती हे पटकन समजत नाही. त्यासाठी काय काळजी घ्यायला हवी जाणून घेऊया. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. उच्च रक्तदाब म्हणजे काय?

सामान्य रक्तदाब हा 120/80 मानला जातो. यापेक्षा जास्त बीपीची पातळी वाढल्यानंतर उच्च रक्तदाब म्हणतात. आजच्या जमान्यात 130/80 हे देखील नॉर्मल बीपी मानले जाते. डब्ल्यूएचओच्या मते, जर रक्तदाब 140/90 किंवा त्याहून अधिक वाढला तर तो उच्च रक्तदाब मानला जातो.

2. उच्च रक्तदाब वाढल्यास ही लक्षणे दिसून येतात

1. तीव्र डोकेदुखी (Headache) हे देखील उच्च रक्तदाबाचे लक्षण आहे, परंतु आजकाल लोक तणाव आणि थकवा समजून त्याकडे दुर्लक्ष करतात. जर तुम्हाला सतत तीव्र डोकेदुखी होत असेल तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा.

2. पुन्हा पुन्हा तहान लागल्यास. पाणी प्यायल्यानंतर तोंडाला कोरडेपणा जाणवत असला तरी त्याकडे दुर्लक्ष करू नका. हे उच्च रक्तदाबाचे लक्षण असू शकते. खरतर हाय बीपी मध्ये जास्त घाम येतो.त्यामुळे डिहायड्रेशन (Dehydration) होते आणि पुन्हा पुन्हा तहान लागते.

3. थकवा जाणवणे आणि उलट्या होणे ही देखील रक्तदाब वाढण्याची लक्षणे आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही लगेच बीपी (Blood Pressure) तपासले पाहिजे. जर बीपी जास्त असेल आणि तुम्हाला आधीच औषध लिहून दिली असतील तर तुम्ही औषधे घेऊ शकता.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

डोंबिवलीत भाजप अन् मनसेत 'डिजिटल युद्ध'! एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाणा

SCROLL FOR NEXT