Badlapur Tourist Places  Saam TV
लाईफस्टाईल

Badlapur Tourist Places : प्री-वेडिंग शूटसाठी बदलापूरमधील सुंदर ठिकाणे; मनसोक्त फोटो काढा

Hidden Places For Pre Wedding Shoot in Badlapur : फोटोशूटसाठी आता तुम्ही देखील निसर्गरम्य जागा शोधत असाल तर आम्ही तुमच्यासाठी एक खास ठिकाण आणि तेथील कपल स्पॉट तुमच्यासाठी शोधले आहेत.

Ruchika Jadhav

सध्या गणेशोत्सव सुरू आहे. गणेशोत्सव संपताच दसरा आणि मग दिवाळी. सण सणावळ्या संपण्यासाठी आता फक्त 2 महिने शिल्लक राहिले आहेत. त्यानंतर पुन्हा लग्न सराई सुरू होत आहे. त्यामुळे अनेक कपल प्री वेडिंग शूटच्या तयारीला लागले आहेत.

प्री वेडिंग शूट म्हटलं की काही जोडपी सुंदर गार्डन पाहतात तर काही जण निसर्गाच्या सानिध्यात प्रेमाचा आनंद घेत फोटोशूट करत असतात. फोटोशूटसाठी आता तुम्ही देखील निसर्गरम्य जागा शोधत असाल तर आम्ही तुमच्यासाठी एक खास ठिकाण आणि तेथील कपल स्पॉट तुमच्यासाठी शोधले आहेत.

या बातमीमधून आपण आज बदलापूरमधील काही ठिकाणे पाहणार आहोत. बदलापूर हे शहर मुंबईच्या ठाणे जिल्यातील सर्वात सुदंर आणि खास शहर आहे. संपूर्ण शहरात पावसामुळे सध्या सर्वत्र हिरवळ पसरली आहे. अशा निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही तुमचे खास क्षण कॅमेऱ्यात कैद करू शकता.

बॅरेज नदी

बॅरेज नदी बदलापूर पश्चिमेला बॅरेज नदी आणि बॅरेज डॅम आहे. पाणी आणि गर्द झाडी असा निसर्ग शोधत असाल तर हे एक उत्तम ठिकाण आहे.

खंडोबा मंदिर

बदलापूरमध्ये मुळगाव परिसरात एक खंडोबा मंदिर आहे. या मंदिराची मोठी ख्याती आहे. मंदिर आणि निसर्ग असा देखावा हवा असेल तर तुम्ही खंडोबा मंदिराला भेट देऊ शकता. हे मंदिर सुंदर टेकडीवर वसलेले आहे.

बुद्ध विहार

तुम्हाला नात्याची सुरुवात करताना विश्वाला शांतीचा संदेश देणाऱ्या गौतम बुद्धांच्या चरणी नतमस्तक व्हायचे असेल तर तुम्ही बदलापूरच्या या भव्य दिव्य मंदिराला भेट देऊ शकता. त्यासाठी तुम्हाला बदलापूर स्टेशनवरून सोनवली गावासाठी रिक्षा मिळेल. भव्य दिव्य विहार या गावातच आहे.

बारवी धारण

बदलापूरमधील सर्वत खास आणि सुंदर असं बारवी धारण देखील फार प्रसिद्ध आहे. येथे जाताना वाटेत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गर्द झाडी लागते. तुम्ही येथे लाँग ड्राईव्हचा आनंद घेऊ शकता. शिवाय मनसोक्त फोटो देखील काढू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs DC: अभिषेक शर्माच्या शतकाच्या मदतीनं हैदराबादने दिल्लीला दिली मात,SRHच्या विजयानंतर Points Table मध्ये मोठी उलथापालथ

Shocking : दुसऱ्या जातीची सून नको! संतापलेल्या चुलत्याचा पुतण्यावर जीवघेणा हल्ला

तरुणीला लॉजवर बोलवलं, अश्लील मेसेज पाठवले; जावेदला मुलीनं दाखवला हिसका, कल्याणमध्ये नेमकं झालं काय?

बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंब एकत्र, सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुळेंची हजेरी

भाऊ-भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात, नितीन गडकरींचा निशाणा कोणावर?|Video Viral

SCROLL FOR NEXT