निरोगी, लांब आणि मजबूत केसांसाठी करा 'हे' सोपे उपाय Saam Tv
लाईफस्टाईल

निरोगी, लांब आणि मजबूत केसांसाठी करा 'हे' सोपे उपाय

छोट्याछोट्या टिप्स वापरून आपले देखील केस चांगले होऊ शकतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

देशातील प्रत्येक मुलीला आपले केस Hair हे लांब असावे असे वाटत असते. जर तुम्हला देखील लांब केस आवडत असले तर त्यासाठी शॉर्टकट नसतो, पण घरगुती छोट्याछोट्या टिप्स Tips वापरून आपले देखील केस चांगले होऊ शकतात.

निरोगी आणि लांबसडक केस देशातील प्रत्येक मुली आणि महिलांचे स्वप्न असते. पण, प्रत्येकाची ही इच्छा पूर्ण होणारच असे नाही. त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. केस वाढवण्यासाठी आपल्या आहारात बदल, चांगल्या प्रकारचे हेअर केयर प्रॉडक्ट वापरणे, चांगले शाम्पू लावण, योग्य तेलाने केसांना मॉलिश करणे गरजेचे असते यामुळे केसांची चांगली वाढ होते. केस मजबूत करण्यासाठी आपल्या रोजच्या आहारामध्ये अंड egg, मासे fishआणि अक्रोड या पदार्थांचा समावेश करावा.

हे देखील पहा -

यामुळे केसांची वाढ वेगाने व्हायला सुरुवात होते. याशिवाय बेलाच्या फळाचे सरबत आणि ताक या २ पदार्थांचा आहारात समावेश करा. दिवसातून २ वेळा ताक आणि बेलाचे सरबत पिल्याने केस मजबूत होतात. तसेच कंडीशनर बरोबर हेअर मास्क देखील केसांसाठी आवश्यक आहे. यामुळे केसांना पोषण मिळते डिप कंडिशनिंग होते. याकरता तुम्ही अंड्याचा हेअर मास्क वापरू शकतो शकता.

तेला मुळे केसांना भरपूर पोषण मिळते. ज्या महिलांना रोज केस धुण्याची सवय आहे त्यांनी रात्री झोपताना केसांना तेल लाऊन दुसऱ्या दिवशी केस धुवावेत. रोज रात्री तेल लावणे शक्य नसल्यास सकाळी केस धुवण्याच्या एक तास आधी केसांना तेल लावून चांगले मॉलिश करा आणि कोमट पाण्याने केस धुवावेत. याशिवाय केसांना एलोवेरा Aelovera जेल लावा. थोड्याच दिवसांनी फरक दिसेल. केसांसाठी नारळाचे तेल अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे केस मजबूत होतात.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Formal Pants For Woman: महिलांसाठी फॉर्मल पॅन्टचे 5 लेटेस्ट डिझाईन्स; ऑफिस लूकसाठी बेस्ट

Actress Death: भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, वृद्धाश्रमात घेतला अखेरचा श्वास

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आक्रमक; हेक्टरी 1 लाख, शेतमजुरांना 25 हजारांची मदतीची मागणी

Bike Mileage: बाईकला किती स्पीडमध्ये चालवली तर चांगलं मायलेज मिळतं? जाणून घ्या योग्य स्पीड

Rajya Sabha Election: मोठी बातमी! राज्यसभेसाठी भाजपकडून ८ उमेदवारांच्या नावाची घोषणा, कुणाला दिली संधी?

SCROLL FOR NEXT