Health Tips  Saam Tv
लाईफस्टाईल

Health Tips : सावधान ! सतत एसीची सवय झालीये ? एसीशिवाय झोप लागत नाही ? होऊ शकतो 'हा' गंभीर आजार

आपण दिवसभरातल्या २४ तासांपैकी ८ ते ९ तास ऑफिसमध्ये असतो.

कोमल दामुद्रे

Health Tips : आपण दिवसभरातल्या २४ तासांपैकी ८ ते ९ तास ऑफिसमध्ये असतो. ऑफिसमध्ये असणाऱ्या एसीची आपल्याला इतकी सवय झालेली असते की, आपल्याला जरा देखील गर्मी सहन होत नाही.

आपल्याला अधिक गरम होऊ लागले की, आपण पंखा किंवा सतत एसीचा वापर करु लागतो. त्यासाठी आपण घरात देखील सतत एसीचा वापर करु लागतो परंतु, त्याचा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

सतत एसीमध्ये बसल्याने आपल्या शरीरातील हाडे व रक्त गोठू लागतात. आपल्या शरीराची हालचाल कमी होऊ लागते. आपले संपूर्ण शरीर थंड पडल्यामुळे आपल्याला काम करण्याची इच्छा देखील होत नाही. (Health Tips)

लोकांना एसीचे इतके व्यसन लागले आहे की अनेकांना एसीशिवाय झोपही येत नाही. तुम्हालाही एसीमध्ये झोपण्याची सवय असेल तर नक्की जाणून घ्या त्यामुळे होणारे नुकसान. एसीमध्ये झोपणाऱ्यांच्या आरोग्यावर अनेक प्रकारे परिणाम होतो. त्याबद्दल जाणून घेऊया-

एसीच्या हवामुळे होणारे नुकसान

एसीमध्ये जास्त वेळ राहिल्याने आपली त्वचा कोरडी होऊ शकते. यासोबतच अनेकांना डोळे कोरडे पडण्याचीही समस्या निर्माण होऊ शकते.

१. डिहायड्रेशन

जर तुम्हाला जास्त वेळ एसीच्या हवेत राहण्याची सवय असेल तर तुम्ही डिहायड्रेशनला बळी पडू शकता. डिहायड्रेशनची समस्या सामान्य तापमानाच्या खोल्यांपेक्षा एसी रूममध्ये जास्त असते. एसी रूम आपल्या शरीरातील आर्द्रता शोषून घेते, ज्यामुळे डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते.

२. कोरड्या डोळ्यांची समस्या

एसीमध्ये जास्त वेळ बसणाऱ्यांना डोळ्यांचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे तुमचे डोळे कोरडे पडू लागतात. अशा परिस्थितीत डोळ्यांना (Eye) खाज सुटणे आणि जळजळ होण्याची समस्या खूप जास्त असते.

३. कोरडी त्वचा

एसीमध्ये बराच वेळ राहणाऱ्यांची त्वचाही खूप कोरडी होते. कारण ते आपल्या शरीरातील आर्द्रता शोषून घेते. त्यामुळे त्वचेवर (Skin) खाज, पांढरे डाग आणि खाज सुटणे सुरू होते.

४. श्वसन समस्या

एसीमध्ये राहणाऱ्यांनाही श्वासोच्छवासाचा त्रास होऊ लागतो. यामुळे आपला घसा खूप कोरडा होऊ लागतो. यासोबतच नाक बंद होण्याची समस्याही कायम आहे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: बच्चू कडूंना जबर धक्का! कार्यकर्त्यांनी बदलला 'भिडू'; शेकडो पदाधिकाऱ्यांचा ठाकरे सेनेत प्रवेश

Vidhanparishad Election: माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांची नात उतरणार निवडणुकीच्या रिंगणात? मविआ टाकणार मोठा डाव

PAN Card: 2 पॅनकार्ड असल्यास काय शिक्षा होऊ शकते?

Maharashtra News Live Update: नवी मुंबईत सोमवारपासून १० टक्के पाणी कपात

Accident News : राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, कार आणि ट्रकची समोरासमोर धडक; एकाच कुटुंबातील ५ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT