Soaked dry fruits, Benefits of dry fruits ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

Benefits of Soaked Dry fruits : दिवसाची सुरुवात करा भिजवलेल्या सुकामेव्याने, होईल मधुमेहांच्या रुग्णांना फायदा

भिजवलेल्या सुक्यामेव्याचा फायदा कसा होतो ?

कोमल दामुद्रे

मुंबई : सुकामेवा खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. त्यात केवळ जीवनसत्त्वे किंवा खनिजेच नाहीत तर ओमेगा-३ फॅटी अॅसिडही असतात.

हे देखील पहा -

सुक्या मेव्याचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करत नाही तर अनियमित हृदयाचे ठोके सुधारण्यास व हृदयविकाराचा झटका टाळण्यास मदत करते. तसेच याचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. सुकामेवा खाण्याचे फायदे अनेक असले तरी त्याचे योग्य सेवन करणे अधिक गरजेचे आहे. याचे सेवन केल्याने पचनसंस्था सुरळीत होते. त्याचे सेवन केल्यास फायदा कसा होतो हे जाणून घेऊया.

१. दिवसाच्या सुरुवातीला भिजवलेला सुकामेवा खाल्ल्याने आपल्या दिवसाची सुरुवात चांगल्या पध्दतीने होते. सुकामेवा भिजवल्यानंतर त्यात असणारे लोह, प्रथिने, कॅल्शियम आणि जस्त यांसारखी आवश्यक खनिजे शरीराद्वारे चांगल्या प्रकारे शोषली जातात. त्यात फायबर जास्त असते. हे तंतू आपल्या शरीरातील चांगल्या जीवाणूंची संख्या वाढवून आपल्या पचनसंस्थेच्या सामान्य आरोग्यास (Health) मदत करतात.

२. आपण सकाळी उठल्यानंतर आपल्याला काही खाण्याचा सल्ला दिला जातो. जे आपल्या शरीरातील ऊर्जेची पातळी वाढवण्यासाठी मदत करते. अशावेळी आपण भिजवलेला सुकामेवा खाणे फायदेशीर ठरू शकते तसेच, आपल्या हार्मोनल आरोग्यासाठी फायदेशीर (Benefits) आहे.

३. आरोग्यदायी पदार्थांचे सेवन करुन वजन कमी करायचे असेल तर आपण सकाळी उठल्यानंतर भिजवलेला सुकामेवा खाऊ शकतो. यामध्ये आपण सर्वात आधी काजू खाण्याचा विचार करावा. यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होईल.

४. मधुमेहींनीही दिवसाच्या सुरुवातीला भिजवलेले काजू खावेत. सुक्यामेव्यात रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्याची क्षमता असते यासाठी मधुमेहाच्या रुग्णांसाठी ते विशेषतः फायदेशीर असतात. मधुमेहामुळे व्यक्तीला हृदयविकार होण्याची शक्यताही वाढते. पण जर आपण रोज सकाळी भिजवलेला सुकामेवा खाण्यास सुरुवात केली तर हृदयाचे आरोग्यही खूप सुधारेल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT