how to manage diabetes without quitting Indian foods  SAAM TV
लाईफस्टाईल

Diabetes Diet : मधुमेह झाला म्हणून भात-पोळी सोडताय? ही चूक करू नका; योग्य आहाराने ठेवा साखर नियंत्रणात

what to eat when diagnosed with diabetes : मधुमेह झाला म्हणून भात आणि पोळी खाणे सोडले आहे का? योग्य आहाराच्या सवयी आणि योग्य प्रमाणाद्वारे रक्तातील साखर कशी नियंत्रणात ठेवता येते.

Saam TV News

मधुमेहाचे निदान झाल्यानंतर अनेकजण सर्वप्रथम आपल्या आहारातून भात, पोळी आणि आंबा, केळी यांसारखी गोड फळे वगळतात. मात्र, या पदार्थांचे सेवन पूर्णपणे बंद करणे हा मधुमेह नियंत्रणात ठेवण्याचा योग्य मार्ग नाही. आहारावर अनावश्यक बंधने घालण्याऐवजी संतुलित आणि योग्य प्रमाणात आहार घेणे अधिक महत्त्वाचे असल्याचे आरोग्यतज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

हार्मोन व मधुमेह रोगतज्ज्ञ्यांच्या मते, मधुमेह असलेल्या व्यक्ती भात आणि पोळी खाऊ शकतात. मात्र, त्यासोबत डाळी आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करणे आवश्यक आहे. यामुळे आहारातील फायबरचे प्रमाण वाढते आणि रक्तातील साखरेवर होणारा परिणाम नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

आंबा, केळी खाण्यावरही बंदी नाही

मधुमेहाच्या रुग्णांनी आंबा, केळी आणि द्राक्षे यांसारखी फळे पूर्णपणे टाळण्याची गरज नाही. मात्र, त्यांचे प्रमाण मर्यादित ठेवणे महत्त्वाचे आहे. फळांचा रस पिण्यापेक्षा संपूर्ण फळ खाणे अधिक फायदेशीर ठरते. फळांमधील फायबरमुळे साखरेचे शरीरात शोषण होण्याची प्रक्रिया मंदावते. कधीतरी चॉकलेटचा छोटा तुकडा खाणेही चालू शकते; मात्र त्याचे नियमित आणि अतिप्रमाणात सेवन टाळावे.

तरुणांमध्येही मधुमेहाचा धोका

मधुमेह आता केवळ चाळिशीनंतर होणारा आजार राहिलेला नाही. तरुणांमध्येही त्याचा धोका वाढत असून, सुमारे ५० टक्के रुग्णांना आपल्याला मधुमेह असल्याची माहिती नसते.जास्त तहान लागणे, वारंवार लघवी होणे आणि नेहमीपेक्षा अधिक भूक लागणे ही मधुमेहाची प्रमुख लक्षणे आहेत. त्यामुळे लक्षणांची वाट न पाहता नियमित रक्तातील साखरेची तपासणी करणे गरजेचे आहे.

प्रत्येक रुग्णाचे वय, वजन आणि रक्तातील साखरेची पातळी वेगळी असते. त्यामुळे वैयक्तिक गरजेनुसार आहार, नियमित व्यायाम, औषधे आणि योग्य जीवनशैली यांचा समतोल राखणे हाच मधुमेह नियंत्रणाचा प्रभावी मार्ग आहे.

मधुमेहींनी भात-पोळी किती खावी?

मधुमेहींनी भात आणि पोळी खाणे पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही. त्यांचे प्रमाण मर्यादित ठेवणे आवश्यक आहे. एका वेळच्या जेवणात साधारण अर्धी वाटी शिजवलेला भात किंवा एक मध्यम आकाराची गव्हाची पोळी खाऊ शकता. भात आणि पोळी दोन्ही खायचे असल्यास भाताचे प्रमाण पाव वाटी आणि अर्धी ते एक पोळी असे ठेवावे.

जेवणात अर्धे ताट हिरव्या पालेभाज्या व इतर भाज्यांनी भरलेले असावे, तर उरलेल्या भागात डाळ, उसळ, कडधान्य किंवा इतर प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश करावा. जेवणानंतर रक्तातील साखर तपासून आपल्या शरीराला किती प्रमाण योग्य आहे हे समजून घ्यावे. प्रत्येक मधुमेही व्यक्तीची गरज वेगळी असते, त्यामुळे वय, वजन, रक्तातील साखर आणि औषधांनुसार आहाराचे प्रमाण ठरवावे.

टीप : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानावर आधारित आहे आहारात कोणतेही बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मी पुढच्या वेळी राज ठाकरे यांना छठ पूजेचं आमंत्रण देणार. त्यांना इकडे घेऊन येणार - कृपाशंकर सिंह

Healthy Breakfast : सकाळी पोटभर नाश्ता करावा की हलका? आयुर्वेद आणि विज्ञान काय सांगतं? जाणून घ्या योग्य पद्धत

BJP Leader Killed: वाद मिटवण्यासाठी गेलेल्या भाजप नेत्याची भरबाजारात हत्या, राजकीय वर्तुळात खळबळ

दोन विमान एकमेकांना धडकले; 166 प्रवासी अन्... भीषण अपघाताने खळबळ

Satara News: चिठ्ठीत गुडबाय लिहित बँक अधिकाऱ्याची आत्महत्या, २ महिला अधिकाऱ्यांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT