what happens to digestion when you drink water while eating saam tv
लाईफस्टाईल

Health Tips : जेवताना पाणी पिता? मग ही चूक करताय की योग्य सवय लावताय? जाणून घ्या सत्य

The Right Way to Drink Water : जेवण करताना भरपूर पाणी पिणे टाळावे. कारण यामुळे पोटाच्या अनेक समस्या होउ शकतात. जाणून घ्या पाणी पिण्याची योग्य पद्धत .

Saam TV News

जेवण करताना पाणी प्यावे की जेवण झाल्यानंतरच पाणी प्यावे, याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असतो. काही लोकांच्या मते जेवताना पाणी प्यायल्याने पचनक्रिया मंदावते, तर काही जण जेवणासोबत पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले असल्याचे सांगतात.

मात्र, वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते जेवताना पाणी पिणे ही कोणतीही चुकीची सवय नाही. उलट, योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने अन्न गिळण्यास आणि पचनक्रियेला मदत होऊ शकते.

जेवताना पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले आहे की वाईट आणि याबाबत तज्ज्ञांचे मत काय आहे.

जेवताना थोडे पाणी पिण्याचे फायदे

गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. रुबल गुप्ता यांच्या मते, जेवताना थोडे-थोडे पाणी पिण्याचे काही फायदे होऊ शकतात. पाणी प्यायल्यामुळे कोरडे अन्न मऊ होण्यास मदत होते. त्यामुळे अन्न गिळणे सोपे जाते.अन्न पचनसंस्थेतून पुढे जाण्याच्या प्रक्रियेला पाणी मदत करते.सलाड, भाज्या आणि धान्यांसारखे फायबरयुक्त पदार्थ खाताना थोडे पाणी प्यायल्याने आराम मिळू शकतो.जेवताना थोडे पाणी प्यायल्याने पोट भरल्याची जाणीव होऊ शकते.

जेवताना पाणी प्यायल्याने पचनक्रिया बिघडते का?

अनेक वर्षांपासून असा समज आहे की जेवताना पाणी प्यायल्याने पोटातील आम्ल आणि पाचक एन्झाइम्स पातळ होतात. त्यामुळे अन्नाचे पचन व्यवस्थित होत नाही. मात्र, वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते हा समज पूर्णपणे योग्य नाही. निरोगी व्यक्तींमध्ये जेवताना सामान्य प्रमाणात पाणी प्यायल्याने पोटातील आम्ल किंवा पाचक एन्झाइम्सच्या कार्यावर लक्षणीय परिणाम होत असल्याचा ठोस पुरावा नाही. आपली पचनसंस्था गरजेनुसार पाचक रसांचे प्रमाण नियंत्रित करू शकते. त्यामुळे जेवताना थोडे पाणी प्यायल्याने पचनक्रिया बिघडत नाही.

जेवताना जास्त पाणी प्यायल्यास काय होऊ शकते?

जेवताना थोडे पाणी पिणे योग्य असले तरी एकाच वेळी जास्त प्रमाणात पाणी पिणे काही व्यक्तींना त्रासदायक ठरू शकते. अतिप्रमाणात पाणी प्यायल्यास पोट फुगल्यासारखे वाटणे,पोट जड होणे, ढेकर येणे, व्यक्तींमध्ये अॅसिडिटी किंवा छातीत जळजळ वाढणे, भरल्यामुळे अस्वस्थता जाणवणे. शेषतः ज्यांना आधीपासून अॅसिडिटी किंवा पचनासंबंधी समस्या आहेत, त्यांनी पाणी पिण्याच्या प्रमाणाकडे लक्ष द्यावे.

जेवताना पाणी पिण्याची योग्य पद्धत कोणती?

  • तज्ज्ञांच्या मते, जेवताना पाणी पिणे पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही. मात्र, काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

  • जेवताना एकदम भरपूर पाणी पिण्याऐवजी थोडे-थोडे पाणी प्यावे.

  • अन्न कोरडे वाटत असल्यास पाणी पिण्यास हरकत नाही.

  • पाणी हळूहळू प्यावे. घाईघाईने पाणी पिऊ नये.

  • साधारण तापमानाचे किंवा कोमट पाणी प्यावे. बर्फासारखे थंड पाणी काहींना अस्वस्थ करू शकते.

  • अॅसिडिटी, गॅस, आयबीएस किंवा जीईआरडीचा त्रास असल्यास आपल्या शरीराला काय मानवते, याकडे लक्ष द्यावे.

जेवताना पाणी प्यावे की जेवणानंतर?

जेवताना किंवा जेवणानंतर पाणी पिण्यास हरकत नाही. जेवताना पाणी प्यायल्याने पचनक्रिया बिघडते किंवा पाचक रस निष्प्रभ होतात, असा ठोस वैज्ञानिक पुरावा नाही. त्र, एकाच वेळी खूप पाणी पिण्यापेक्षा दिवसभर नियमितपणे पाणी पिणे अधिक चांगले. दय, किडनी किंवा यकृताच्या आजारामुळे ज्यांना पाणी पिण्यावर मर्यादा घालण्यास सांगितले आहे, त्यांनी डॉक्टरांनी सांगितलेल्या प्रमाणाचे योग्य पालन करावे.

जेवताना पाणी पिणे ही आरोग्यासाठी वाईट सवय नाही. उलट, योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने अन्न गिळणे सोपे होते आणि शरीरातील पाण्याची गरज पूर्ण करण्यास मदत होते. त्यामुळे जेवताना पाणी पिणे पूर्णपणे बंद करण्याची आवश्यकता नाही. फक्त तहानेनुसार आणि शरीराला आरामदायी वाटेल अशा प्रमाणात पाणी प्यावे.पाणी पिण्याची योग्य वेळ ठरवण्यापेक्षा दिवसभर शरीरात पुरेसे पाणी जाणे अधिक महत्त्वाचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Politics: मोठी बातमी! NDA ची ताकद वाढली, ४ मोठे पक्ष सहभागी; संख्याबळ ४२ खासदारांनी वाढले

Maharashtra News Live Update: शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल; सुप्रिया सुळे बैठक सोडून रुग्णालयाकडे रवाना

Sharad Pawar Hospitalised : शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल; बैठक सोडून सुप्रिया सुळे तातडीने रुग्णालयाकडे रवाना

Gold Rate Today : सुवर्णनगरीत सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीही ४००० रुपयांनी महागली; वाचा आजचे दर

Health Tips : पपई खाताय? मग सावधान! या ४ प्रकारच्या लोकांनी खाणं टाळावं, होऊ शकतो त्रास

SCROLL FOR NEXT