Yoga, Yoga life, Health news, Health Tips, Yogasan ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

Health tips : शरीर सुदृढ ठेवण्यासाठी योगासने करताय ? जाणून घ्या त्याच्याबद्दल महत्त्वाच्या गोष्टी

योगासने करण्याची योग्य वेळ कोणती

कोमल दामुद्रे

मुंबई : आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनशैलीत स्वत : ला फिट ठेवण्यासोबत आपल्या मानसिक व शारीरिक आरोग्यारकडे लक्ष देणे अधिक गरजेचे आहे. आपले शरीर सुदृढ ठेवण्यासाठी आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला हवे.

हे देखील पहा -

वाढलेले वजन असो किंवा आपल्या फिट राहयचे म्हणून आपण केलेला व्यायाम, योगासने आपल्याला अधिक फायदेशीर ठरले जातात. अनेक योगासने अवघ्या अर्ध्या तासात शरीर निरोगी बनवण्यास मदत करतात. योगामुळे शरीराला दिवसभर काम करण्याची ऊर्जा मिळते. योगासने शरीरासाठी खूप महत्त्वाची आहेत. नियमित योगासने केल्याने शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहतात.

शरीराशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्यांवरही योगाच्या मदतीने मात करता येते. योगासने करण्यापूर्वी अनेक गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. चला जाणून घेऊया योगाशी संबंधित नियम

१. योग करण्यासाठी नेहमी अशी जागा निवडा, जिथे शांततेसह स्वच्छता असेल आणि मोकळी जागा असेल. योगासन करताना आजूबाजूचे वातावरण चांगले असेल तर मनाला शांती लाभते. पण खूप जोराचा वारा, कूलर, एसी खाली योगासने अजिबात करू नका.

२. योग ज्या ठिकाणी करणार असाल तर चटई किंवा जागा सपाट असायला हवी. स्थान उंच-नीच असल्यास योगासने करण्यात अडचण येऊ शकते. योगा करताना नेहमी योगा मॅटचा वापर करा.

३. योगा करताना घट्ट आणि अतिशय लहान कपडे घालू नका. सैल आणि आरामदायी कपडे घाला. यामुळे योगासने (Yogasan) करताना कोणतीही अडचण येणार नाही.

४. योग कराल तेव्हा पोट रिकामे असायला हवे हे लक्षात ठेवा. यामुळे जास्त फायदा होईल. अन्न खाल्ल्यानंतर योगासने करत असाल तर जेवण आणि योगामध्ये किमान तीन तासांचे अंतर असायला हवे याचे भान ठेवा.

५. योगासने करण्याची काही विशिष्ट वेळ नाही, पण अन्न खाल्ल्यानंतर लगेच योगासने करू नयेत. योगा करण्यासाठी सकाळ किंवा संध्याकाळची वेळ (Time) निवडा. यावेळी योगासने केल्याने शरीराला अधिक ऊर्जा मिळते

शरीर निरोगी ठेवण्यासाठी योगासने करण्यापूर्वी या सर्व महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा जेणेकरून शरीराला कोणत्याही प्रकारे नुकसान होणार नाही.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Boondi Ladoo Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट बनवा टेस्टी बुंदी लाडू

Maharashtra Live News Update: जामखेली धरण पूर्ण क्षमतेने भरून झाले ओव्हरफ्लो

Nitesh Rane : विषय थेट अंतरपाटापर्यंत गेला, यांच्यामध्ये नवरदेव कोण अन् नवरी कोण? नितेश राणेंचा खोचक सवाल

Thackeray: पुष्पा ते लाडकी बहीण, मुंबईत ठाकरेंची तोफ धडाडली; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT