Health tips, Menstrual period, Skin care ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

Health tips : मासिक पाळीदरम्यान चेहऱ्यावर किंवा त्वचेच्या इतर भागावर मुरुमे येतात ? जाणून घ्या त्यामागचे तथ्य

मासिक पाळी उशीरा आल्यावर काय होते ?

कोमल दामुद्रे

मुंबई : आपली मासिक पाळी चुकली आहे की, ती उशीरा आली आहे ? जर ती उशीरा आली असेल तर यामुळे आपल्याला काही गंभीर आजार किंवा त्वचेवर पुरळ येण्याची शक्यता असते.

हे देखील पहा -

मासिक पाळीदरम्यान आपल्या त्वचेवर जे काही बदल होतात त्यावर आपण लक्ष दिले पाहिजे. मात्र, या काळात मुरुम आणि पुरळ येण्याची समस्या सामान्य असते. मात्र यापेक्षा जास्त असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. विशेषत: जर तुमच्या छातीत पुरळ उठू लागले तर तुम्ही सावध राहण्याची गरज आहे. जाणून घेऊया मासिक पाळी दरम्यान असे का होते?

प्रोजेस्टेरॉन हा स्त्री शरीरात आढळणारा हार्मोन आहे. हे महिलांच्या गर्भाशयात इस्ट्रोजेनची पातळी कमी करून हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी म्हणून काम करते. त्यामुळे महिलांना मासिक पाळी येते. हे मासिक पाळी नियमित करण्यास देखील मदत करते.

raredisease.Info.nih.gov च्या साइटनुसार, त्वचेची प्रतिक्रिया प्रोजेस्टोजेनच्या अतिसंवेदनशीलतेमुळे होते. हे सहसा मासिक पाळीच्या दरम्यान घडते. मासिक पाळीच्या ३ ते १० दिवसाधी त्याची लक्षणे दिसू लागतात. पण हे पीरियड्स संपताच ते निघून जातात. त्वचेच्या प्रतिक्रियांमध्ये सूज, अंगावर उठणाऱ्या पित्ताच्या गाठी, खाज सुटणे, फ्लॅकी पॅचेस यांचा समावेश होतो हे वाढल्यास फोड व दम्यासारखी लक्षणे दिसू लागतात. ओव्हुलेशननंतर किंवा त्याचा कालावधी संपल्यानंतर प्रोजेस्टेरॉनची पातळी हळूहळू वाढू लागते. शरीरात जेव्हा त्याची पातळी वाढते तेव्हा त्याची लक्षणे प्रीमेनस्ट्रुअल सिंड्रोमसारखीच असतात. या काळात स्तनांमध्ये सूज, नैराश्य, थकवा आणि वजन वाढू शकते. मात्र, अनेक महिलांमध्ये पिरियड्सच्या काळात मुरुमांची (Pimples) समस्या दिसून येते. या ऍलर्जीला चालना देणारे काही हार्मोन्स आहेत. परंतु काही स्त्रियांमध्ये, स्थिती क्रॉनिक आणि घातक होऊ शकते, ज्याला ऑटोइम्यून प्रोजेस्टेरॉन डर्माटायटीस (APD) म्हणून समजले जाते. आपल्याला देखील असा त्रास होत असल्यास वेळीच त्याच्यावर उपचार करावा किंवा डॉक्टरांचा (Doctor) सल्ला घ्यावा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Star Fruit : आंबट समजून 'स्टार फ्रूट'कडे करताय दुर्लक्ष, ते हृदयासाठी गुणकारी; फायदे वाचून व्हाल थक्क

Maharashtra News Live Update: गणेश विसर्जनाला यंदा विलंब; भरती-ओहोटी आणि भव्य मिरवणुका ठरल्या कारणीभूत

Saree Designs: महिलांसाठी पार्टीवेअर साड्यांचे सुंदर कलेक्शन, या 5 डिझाईन्स पाहून प्रेमात पडाल

Gadchiroli Flood : गडचिरोलीत पावसाचा कहर! पर्लकोटा नदीला महापूर, भामरागड शहराला पुराचा वेढा; अनेक रस्ते पाण्याखाली

Face Care: उन्हामुळे चेहऱ्याची चमक गेली? 'या' घरच्या पद्धतीने ५ मिनिटांत त्वचा होईल ग्लोइंग

SCROLL FOR NEXT