Happy Children's Day 2022 Saam Tv
लाईफस्टाईल

Happy Children's Day 2022 : बालदिन का साजरा केला जातो ? यादिनासाठी चाचा नेहरुंना अधिक महत्त्व का दिले जाते ?

पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते.

कोमल दामुद्रे

Happy Children's Day 2022 : दरवर्षी १४ नोव्हेंबर हा दिवस देशभरातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये बालदिन म्हणून साजरा केला जातो. १४ नोव्हेंबर हा जवाहरलाल नेहरूंचा जन्मदिवस. त्यांचा वाढदिवस बालदिन म्हणून साजरा (Celebrate) केला जातो कारण ते लहान मुलांवर खूप प्रेम करत होते.

पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे (India) पहिले पंतप्रधान होते. त्यांचे मुलांवर इतके प्रेम होते की, त्यांना चाचा नेहरू म्हणूनही ओळखले जाते. यामुळेच भारताच्या संसदेने त्यांचा जन्मदिवस १४ नोव्हेंबर रोजी बालदिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यांना मुलांबद्दल अपार प्रेम आणि आदर होता आणि त्यांना आपल्या देशाचे भविष्य मानले जाते. त्यामुळे भारतात १४ नोव्हेंबर हा बालदिन म्हणून साजरा करण्यात आला.

'या' दिवशी बालदिन जागतिक पातळीवर साजरा करतात

जगात पहिल्यांदा इंग्लंडमध्ये 1856 मध्ये चेल्सी इथे बालदिन साजरा झाला. त्याकाळी चर्चमध्ये लहान मुलांसाठी एक स्पेशल दिवस ठेवण्यात आला होता. लहान मुलांसाठी त्यांच्या आवडीच्या खास गोष्टी, वेगवेगळे खेळ आयोजित करून त्यांचा हा खास दिवस साजरा करण्यात आला होता. त्यानंतर हळूहळू जगातील इतर देशांमध्ये बालदिन साजरा करण्यास सुरूवात झाली.

इतिहास व महत्त्व (History And Importance)

पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांच्या एका प्रसिद्ध भाषणात म्हटले होते, "आजची मुले उद्याचे भविष्य असतील. आपण त्यांना ज्या पद्धतीने वाढवतो ते देशाचे भविष्य ठरवतील." पं. जवाहरलाल नेहरू यांचे 1964 साली निधन झाले आणि त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा करण्याचा ठराव संसदेने मंजूर केला. याआधी भारतात बालदिन 20 नोव्हेंबर रोजी साजरा केला जात होता.

बालदिन साजरा करण्यामागचा उद्देश पंडित नेहरूंना आदरांजली अर्पण करणे हा आहे. लहान मुलांच्या लाडक्या चाचा नेहरूंना आदरांजली म्हणून त्यांच्या जन्मदिनी म्हणजेच 14 नोव्हेंबरला भारतात बाल दिन साजरा केला जातो. पंडित जवाहरलाल नेहरू यांना "आधुनिक भारताचे शिल्पकार" म्हणूनही ओळखले जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बुलढाण्याला मिळणार गोड पाणी ; दिवाळी होणार गोड

BEST Election : ठाकरे बंधूंच्या युतीची लिटमस टेस्ट, भाजपविरोधात आज मैदानात, कोण जिंकणार निवडणूक?

GST Reforms: खुशखबर! कार आणि बाईकच्या किंमती कमी होणार? जाणून घ्या केंद्र सरकारची मोठी योजना

साताऱ्यात दहीहंडीचा जल्लोष! Udayanraje Bhosale यांनी उडवली हटके स्टाईल कॉलर, पाहा व्हिडीओ

Ladki Sunbai Yojana: लाडकी बहीणनंतर लाडकी सुनबाई योजना! उपमुख्यमंत्र्यांनी केला शुभारंभ; नक्की आहे तरी काय?

SCROLL FOR NEXT