Hair falls problem, Hair care tips ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

Hair care tips : केस सतत गळताय, या पाण्याने केस धुतल्यास मिळतील अनेक फायदे !

केस गळतीची समस्या कशी रोखाल ?

कोमल दामुद्रे

मुंबई : केस गळती थांबवण्यासाठी आपण अनेक प्रकारचे उपाय करत असतो. काही आयुर्वेदिक तर काही घरगुती उपाय करुन आपण केस गळती थांबवण्याचा प्रयत्न करत असतो.

हे देखील पहा -

केस गळण्याची अनेक कारणे असू शकतात, परंतु त्याची गळती रोखण्यासाठी काही उपाय पाहणार आहोत. ज्यामुळे केसांना आणखी अनेक फायदे होतील. केस धुताना आपण कोणत्या प्रकारचे पाणी केस धुताना वापरतो. आपण केस धुताना गरम पाणी वापरतो की, थंड पाणी. गरम पाण्यामुळे आपली त्वचा आणि केस दोघांचेही नुकसान होते. त्यासाठी केस धुताना पाणी तपासून पहा. तसेच मिठाचे सेवन आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहे कारण यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. पण मीठ आपल्या केसांसाठी आणि त्वचेसाठी देखील खूप चांगले आहे. जर कोणत्याही कारणाने केस गळायला लागले तर त्यांची काळजी वाढते. ही केस गळती थांबवण्यासाठी हे उपाय करुन पहा.

१. गरम पाण्याच्या वापरामुळे डोक्याचे केस कमकुवत होतात आणि तुटतात, खरे तर गरम पाण्यात भरपूर सोडियम असते, ज्यामुळे केस पातळ होतात आणि खराब होतात. या प्रकरणात, रॉक सॉल्ट वॉटर सॉफ्टनर म्हणून कार्य करते. त्यासाठी केस धुण्यापूर्वी पाण्यात मीठ घालून काही वेळा ने केस धुवा.

२. आपले केस (Hair) खूप तेलकट असतील तर मिठाच्या पाण्याने केस धुतल्याने टाळूवरील अतिरिक्त तेलाची निर्मिती थांबते. यामुळे आपले केस चिकट दिसत नाहीत.

३. आपल्याला कोंड्याची समस्या असेल तर मिठाच्या पाण्याने केस धुतल्याने आपल्याला अनेक फायदे मिळतील. यामुळे आपली समस्या बर्‍याच प्रमाणात कमी होईल.

४. मिठाच्या पाण्याने (Water) केस धुतल्याने स्कॅल्प इन्फेक्शन होण्याची शक्यताही कमी होते. परंतु, पाण्यात जास्त मीठ घालू नका त्यामुळे टाळूला चिकटलेल्या स्कॅल्पची आग होईल.

५. तसेच आपल्या घरी बोरिंगचे पाणी येत असल्यासही केस गळतीची समस्या होऊ लागते अशावेळी आपण पाण्यात मीठ घालून ती स्वच्छ करु शकतो. त्यानंतर केस धुतल्यास केस गळतीची समस्या कमी होईल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये पोलिसांची दंगा काबू योजना रंगीत तालीम, अधिकारी-अंमलदारांचा मोठा सहभाग

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

SCROLL FOR NEXT