Herbs For Hair, Hair Care Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Herbs For Hair : कोरड्या-रखरखीत केसांमुळे वैतागले आहात? हे ४ आयुर्वेदिक पदार्थ ठरतील फायदेशीर

Hair Care Tips : कधी कधी केसांच्या इतक्या समस्या होतात की, टक्कल पडण्याची भीती आपल्याला सतावते. अशावेळी आपण अनेक केमिकल पदार्थांचा, तेलाचा वापर करतो. याचा आपल्याला फायदा होत असला तरी दुष्परिणाम सहन करावा लागतो.

कोमल दामुद्रे

How To Reduce Hair Falls :

चेहऱ्याच्या सौंदर्याबरोबर केसांचे आरोग्य निरोगी राखणे देखील गरजेचे आहे. केस तुटणे, केसगळती, केसात कोंडा होणे, केस कोरडे आणि रखरखीत होणे यांसारख्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. ज्यामुळे त्वचेसोबत केसांचे सौंदर्य खराब होते.

कधी कधी केसांच्या (Hair) इतक्या समस्या होतात की, टक्कल पडण्याची भीती आपल्याला सतावते. अशावेळी आपण अनेक केमिकल पदार्थांचा, तेलाचा वापर करतो. याचा आपल्याला फायदा होत असला तरी दुष्परिणाम सहन करावा लागतो.

केसांना सॉफ्ट आणि शाइन बनवायचे असेल तर आयुर्वेदिक पदार्थ फायदेशीर ठरणार आहे. केसांना फाटे फुटू नये तसेच केसांना पोषक घटक कसे मिळतील हे देखील पाहायला हवे. कसा वापर करायचा हे पाहूया

1. मेथी दाणे

केसांना आतून पोषण देण्यासाठी मेथी दाणे अधिक उपयुक्त आहे. मेथी दाण्याचे पाणी पिऊन बारीक करुन पेस्ट केसांना लावा. रात्री झोपण्यापूर्वी मेथीचे दाणे भिजवून ठेवावे आणि सकाळी ते पाणी प्यावे. याची पेस्ट केसांना लावल्याने केस काळे, लांब, घट्ट आणि मजबूत होतात.

2. आवळा

आवळा केसांसोबत आरोग्यासाठी (Health) बहुगुणी आहे. आवळा शरीराला जितका पोषण पुरवण्यास मदत करतो तितकाच बाहेरील अशुद्धी दूर करण्यास मदत करतो.

3. लॅव्हेंडर

लॅव्हेंडर हे त्यांच्या सुंगधासाठी ओळखले जाते. यामध्ये प्रतिजैविक गुणधर्म आहेत, जे आपल्या टाळूवर बॅक्टेरिया आणि बुरशीच्या वाढीस प्रतिबंध करतात. हे केसांना अंतर्गत पोषण देण्यास मदत करतात. तसेच आतून मजबूत ठेवतात.

4. कोरफड

व्हिटॅमिन (Vitamins) ए, सी, ई आणि व्हिटॅमीन बी १२ ने समृद्ध कोरफड जेल हे एक औषधी वनस्पती आहे. याचा आपल्या डोक्यापासून पायापर्यंत सर्व प्रकारे फायदा होतो. केसांना अंतर्गत पोषण आणि हायड्रेशन देण्याबरोबरच केस काळे, लांब आणि जाड ठेवण्यास मदत करते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवसेना शिष्टमंडळाची महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

SCROLL FOR NEXT