Government Married Couple Scheme Saam Tv
लाईफस्टाईल

Government Married Couple Scheme : विवाहित जोडप्यांना सरकार देणार दरमहा 18500 रुपये; असा घ्या, लाभ ?

आज आम्ही तुम्हाला अशाच एका स्कीमबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये सरकार तुम्हाला दर महिन्याला पैसे देईल.

कोमल दामुद्रे

Government Married Couple Scheme : लग्न झालेल्या जोडप्यांना सरकारच्या अनेक योजनेबद्दल माहित नसते. केंद्र सरकारकडून अनेक सरकारी योजना राबविण्यात येतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका स्कीमबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये सरकार तुम्हाला दर महिन्याला पैसे देईल. या योजनेचे नाव आहे PM वय वंदना योजना (प्रधानमंत्री वय वंदना योजना), ज्यामध्ये तुम्हाला वृद्धापकाळात दर महिन्याला पैसे मिळतील. ३१ मार्च २०२३ पर्यंत तुम्ही या सरकारी योजनेचा (Scheme) लाभ घेऊ शकता.

1. 10 वर्षांनी मिळतील पूर्ण पैसे

ही एक प्रकारची पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये तुम्हाला मासिक पैसे मिळू शकतात. यामध्ये पती-पत्नीला महिन्याला 18500 रुपये मिळतात. विशेष म्हणजे यामध्ये तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत आणि 10 वर्षानंतर तुम्हाला संपूर्ण पैसे व्याजासह परत मिळतात.

2. 18500 रुपये कसे मिळवायचे?

जर या योजनेत कोणत्याही पती-पत्नीने प्रत्येकी 15 लाखांची गुंतवणूक केली, म्हणजे एकूण 30 लाखांची गुंतवणूक केली, तर तुम्हाला 7.40% दराने व्याजाचा लाभ मिळेल. या रकमेवर तुम्हाला व्याजातून 2,22000 रुपये वार्षिक उत्पन्न मिळेल. जर ही व्याजाची रक्कम 12 महिन्यांत विभागली गेली तर तुम्हाला दरमहा 18500 रुपये मिळतील आणि ही रक्कम (Money) तुमच्या खात्यात पेन्शन म्हणून येईल.

3. एकट्यानेही गुंतवणूक करु शकता

जर फक्त एका व्यक्तीला या योजनेत गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही जास्तीत जास्त 15 लाखांची गुंतवणूक करू शकता, ज्यावर तुम्हाला वार्षिक 111000 रुपये व्याज म्हणून मिळतील, म्हणजेच दरमहा 9250 रुपये तुमच्या खात्यात येतील.

4. या योजनेचा कालावधी किती ?

या योजनेचा परिपक्वता कालावधी 10 वर्षांचा आहे. या योजनेत तुम्ही 10 वर्षांसाठी पैसे गुंतवू शकता. जर तुम्ही त्यात 10 वर्षांसाठी गुंतवणूक केली तर तुम्हाला तुमचे गुंतवलेले पैसे 10 वर्षांनंतर परत मिळतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

Shadashtak Yog 2026 : ९ ऑक्टोबरपासून धोकादायक योग! ४ राशींवर कोसळणार अडचणींचा डोंगर; तुमची रास तर नाही ना?

जगात पुन्हा लॉकडाऊन लागणार? रशियात लॅबमध्ये 'ती' एक चूक झाली अन् एकाचा मृत्यू; २०० जण क्वारंटाईन

Shreyas Iyer: ‘योग्य वेळ आली की तो राज्य करेल’, वैभव सूर्यवंशीच्या भवितव्याबाबत श्रेयस अय्यरचा मोठा विश्वास

SCROLL FOR NEXT