Ola Scooter Subscription  Saam Tv
लाईफस्टाईल

Ola Scooter Subscription : खुशखबर! ओलाने सुरू केलाय सबस्क्रीप्शन प्लॅन, सामान्य लोकं सुद्धा घेऊ शकतात ही इलेक्ट्रॉनिक स्कूटर

Electric Vehicle : जर तुम्हाला सुद्धा एक इलेक्ट्रॉनिक स्कूटर खरेदी करायची आहे. परंतू तुमच्याजवळ हवे तेवढे पैसे नसल्यामुळे खरेदी करता येत नाही आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Ola Subscription Plans : जर तुम्हाला सुद्धा एक इलेक्ट्रॉनिक स्कूटर खरेदी करायची आहे. परंतू तुमच्याजवळ हवे तेवढे पैसे नसल्यामुळे खरेदी करता येत नाही आहे. तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे.

तुम्हाला अगदी कमी पैशांमध्ये ओला स्कूटर विकत घेता येऊ शकते. यामुळे कंपनीने स्वतःचे सबस्क्रीप्शन प्लॅन सुरू केले आहे. ओला इलेक्ट्रॉनिक ने आपल्या ग्राहकांसाठी दोन नवीन सबस्क्राईब प्लॅनची घोषणा केली आहे.

यामध्ये ओला केअर आणि ओला केअर+ आहे. हे सबस्क्रीप्शन - बेस्ड प्लॅन आहे. ज्यांची किंमत (Price) क्रमाने 1,999 रूपये आणि 2,999 रूपये आहे. याशिवाय 2023 पर्यंत सगळीकडे 200 एक्सपिरियंस सेंटर खोलण्याचा प्लॅन ओला टारगेटचा आहे.

सबस्क्रीप्शन प्लॅन सोबत कंपनीने (Company) अनेक ऑफर दिल्या आहेत. ओला केअर प्लॅनमध्ये फ्री लेबर सर्व्हिस , चोरीसाठी हेल्पलाईन आणि रोड साईड आणि पंचर असिस्टंट सामिल आहेत. ओला केअर+ शिवाय ओला केअरच्या प्रॉफिटमध्ये डायग्नोस्टीक, फ्री होम सर्विस आणि पीक अप/ ड्रॉप, 24/7 डॉक्टर आणि ॲम्बुलन्स सर्विस सामील आहे.

कस्टमर सर्व्हिस सर्वांत चांगली -

ओलाचे चीफ मार्केटिंग ऑफिसर अंशुल खंडेलवाल यांनी सांगितले की, ग्राहक केंद्रित ब्रांड असल्यामुळे ही सर्विस नेहमी आमच्यासाठी सर्वोच्च स्थानावर असणारं आहे. ओला केअर सबस्क्रीप्शन प्लॅनच्या माध्यमातून आम्ही ग्राहकांना अनुभवाची पूर्ण नवीन कल्पना देणार आहोत.

आपल्या ग्राहकांसाठी विक्री नंतर चांगली सर्विस देणे हे आमचं कर्तव्य आहे. सबस्क्रीप्शन प्लॅन ग्राहकांना आमच्या सर्विस नेटवर्कपर्यंत 360 डिग्री ची पोहोच प्रदान करते. जी ग्राहकांना त्याच्या घरी किंवा जवळपास एक्सपिरीयन्स सर्विस सेंटर सुविधा प्रदान करण्यासाठी तयार आहोत.

ओलाचा प्लॅन -

ओला इलेक्ट्रिकच्या लाईनअप मध्ये सध्या दोन इलेक्ट्रॉनिक स्कूटर आहेत. S1 आणि S1 प्रो. या ब्रांडने गेल्यावर्षी अनेक S1 Air स्कूटरला लॉन्च केले होते. S1 एअरची डिलिवरी एप्रिल 2023 पासून सुरू होऊ शकते.

हा ब्रांड भारतीय बाजारासाठी 6 नवीन इलेक्ट्रॉनिक वाहनांवर सुद्धा काम करत आहेत. एक प्रीमीयम मोटारसायकल, एक मास- मार्केट मोटारसायकल, एक प्रीमियम कार, एक प्रीमियम SUV आणि एक मास- मार्केट कार असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sukanya Samriddhi Yojana: ₹1.5 लाख गुंतवा अन् ₹71.82 लाख मिळवा! जाणून घ्या कन्या सुकन्या समृद्धी योजनेचे गणित

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

Nitin Gadkari : नितीन गडकरी राजकारणातून निवृत्त होणार का? कालच्या त्या वक्तव्यावर थेट ऑफिसमधून स्पष्टीकरण

पूर्ण फी भरली, तरी प्रशिक्षण नाही! VLCC विरोधात मनसेचा धडक मोर्चा

BJP News: भाजपमधील अंतर्गत गटबाजी उफाळली; तावडेंना मुंबई अध्यक्षांनी थेट सुनावलं, नगरसेवकांनाही आरसा दाखवला

SCROLL FOR NEXT