Skin care, Skin care tips, Glowing skin care tips ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

Glowing skin care tips : चमकदार त्वचेसाठी या पदार्थांचा आहारात समावेश करा

त्वचेचा ग्लो कसा वाढवाल ?

कोमल दामुद्रे

मुंबई : सुंदर त्वचा कोणाला आवडत नाही ? नितळ त्वचा कोणाला आवडत नाही ? त्यासाठी स्त्रिया वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिम्स आणि रसायनिक उत्पादनचा वापर करत असतात.

हे देखील पहा -

आपण जे काही अन्न पदार्थ त्याचा परिणाम आपल्याला शरीरासोबत त्वचेवर देखील होत असतो. आपण काय खातो यापासून आपल्यात होणारे बदलांचा आपल्याला त्वचेवर दिसून येते. आपण आहारात कोणत्या पदार्थाचा समावेश केल्यास आपली त्वचा नैसर्गिकरित्या ग्लो करु शकेल हे जाणून घ्या.

१. आपण आपल्या आहारात सुकामेव्यातील आक्रोडचा समावेश करु शकतो. अक्रोडचा वापर आपण अनेक गोडाच्या पदार्थांमध्ये केला जातो. आक्रोडच्या तेलामुळे त्वचा व केसांचे आरोग्य सुधारते. अक्रोडमध्ये व्हिटॅमिन ई आणि प्रोटिन्स असतात. त्यामुळे हे केसांसाठी आणि त्वचेचे सौंदर्यसाठी बहुगुणी मानले जाते. त्यामुळे आठवड्यातून एकदा अक्रोडाचे तेल चेहऱ्याला लावल्यास तो चमकण्यास मदत होईल.

२. सूर्यफुलाच्या बियांमध्ये जस्त, सेलेनियम, खनिजे, फॅटी ऍसिडस् भरपूर प्रमाणात असतात जे आपल्या त्वचेचे पोषण करतात. त्वचा (Skin) मऊ आणि निरोगी बनवण्यासाठी या बिया फायदेशीर ठरतात. त्यामुळे आपण आहारात या बियांचा समावेश केल्यास त्वचा नितळही बनेल.

३. रताळे हे शरीरासाठी अधिक फायदेशीर आहे. वाफवून किंवा भाजून खाल्ल्याने याचा फायदा होतो. यामध्ये जीवनसत्त्व ड चा मोठ्या प्रमाणात साठा आहे. याचे सेवन केल्यास त्वचेच्या सुरकुत्या कमी होतात व रोगप्रतिकारशक्ती देखील मजबूत होते.

४. टोमॅटो हा आहारात अधिक उत्तम मानला जाणारा घटक आहे. टोमॅटोच्या गुणधर्मामुळे सूर्याच्या किरणांपासून त्वचेचे रक्षण होते. यामध्ये जीवनसत्त्व (Vitamins) क, ए व ई मुबलक प्रमाणात आढळते त्यासाठी आपल्या आहारात टोमॅटोचे सेवन करायला हवे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Virat Kohli: विराट कोहलीचा मोठा खुलासा; 2027 चा वर्ल्डकप भारतासाठी शेवटचा, रोहितनेही सांगितला प्लान

Maharashtra News Live Update: पंढरपुरात कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासाठी राष्ट्रवादीचा तहसील कार्यालयावर मोर्चा

Asian Games 2026 : भारतीय महिला कबड्डी संघानं इतिहास रचला; एशियन गेम्समध्ये गोल्ड मेडलवर कोरलं नाव, ईराणला नमवलं

Gyanesh kumar : ज्ञानेश कुमारांविरोधात मुंबईत ठाकरेंचं वादळ; ४ ऑक्टोबरला शिवसेना-मनसेचा महामोर्चा

Hair Care: हेअर फॉल होईल कमी, फक्त ३ आठवडे कांद्याचा रस लावून पाहा, केस होतील मजबूत आणि घनदाट

SCROLL FOR NEXT