Simple remedies to boost luck saam tv
लाईफस्टाईल

Budhwar Upay: हे सोपे उपाय करून नशीबाला द्या कलाटणी; नोकरीपासून बिझनेसमध्ये मिळणार उत्तम संधी

Simple remedies to boost luck: नोकरी किंवा व्यवसायात मोठ्या संधी मिळवण्यासाठी, तसेच अडथळे दूर करण्यासाठी काही सोपे उपाय ज्योतिषशास्त्र आणि पारंपरिक समजुतींनुसार खूप प्रभावी मानले जातात.

Surabhi Jayashree Jagdish

  • बुधवार हा श्रीगणेशाच्या पूजेसाठी अत्यंत शुभ दिवस मानला जातो.

  • हिरव्या मूगाचे दान केल्याने करिअरमधील अडथळे दूर होतात.

  • गोशाळेत हिरव्या चाऱ्याचे दान केल्याने नोकरीत प्रगती होते.

हिंदू धर्मात बुधवारचा दिवस श्रीगणेशाच्या उपासनेसाठी अतिशय शुभ मानला जातो. गणपती हे विघ्नहर्ता असून त्यांच्या कृपेने जीवनातील अडथळे दूर होण्यास मदत होते. यावेळी गणपती बाप्पाच्या पुजेने अनेक यशस्वी मार्ग खुले होण्यास मदत होते.

ज्योतिषशास्त्रानुसार, बुधवारचे काही खास उपाय केल्यास बुध ग्रह बळकट होतो. त्यामुळे बुद्धी, वाणी आणि व्यवसायात प्रगती घडू लागते. आज जाणून घेऊया असे कोणते उपाय आहेत जे करून तुम्ही करिअर, शिक्षण, नोकरी आणि पैशांच्या अडचणींवर मात करू शकता.

गोरगरीबांना हिरवे मूग करा दान

ज्यांच्या नोकरी, शिक्षण किंवा करिअरमध्ये अडथळे येत आहेत, त्यांनी बुधवारी मंदिराजवळ गरीबांना हिरव्या मूगाच्या डाळीचं दान करावं. यामुळे कुंडलीतील बुध ग्रह बळकट होतो. याशिवाय करिअरमध्ये यश मिळायला मदत होते.

गोशाळेत हिरव्या चाऱ्याचं दान

बुधवारी गोशाळेत हिरव्या चाऱ्याचं दान केल्यास नोकरीतील अडथळे कमी होतात. त्याचप्रमाणे पदोन्नतीचे मार्ग मोकळे होतात आणि करिअरमध्ये नवे दरवाजे उघडतात. यामुळे नकारात्मकता दूर जाऊन आत्मविश्वास वाढण्यासही मदत होते.

मंत्रजापाने नशीब बदला

बुधवारी सकाळी लवकर उठून स्नान करून हिरव्या रंगाचे कपडे परिधान करा. घरातील देवघरात गणपतीची विधिवत पूजा करा. पूजा करताना २१ दुर्वांची गाठ तयार करा आणि ॐ गं गणपतये नमः या मंत्राचा १०८ वेळा जप करा. मंत्रजप संपल्यानंतर त्या दुर्वा गणपतीला अर्पण करा. या उपायामुळे आयुष्यातील त्रास कमी होतील आणि नशिबाची दारे उघडण्यास महत होते.

हिरव्या रंगाचा नैवेद्य अर्पण करा

ज्यांच्या आयुष्यात आर्थिक संकट आहे, त्यांनी बुधवारी गपणती बाप्पाची विशेष पूजा करावी. त्यांना हिरव्या रंगाचं उदा. पिस्ता बर्फी, हिरव्या रंगाची बासुंदी इ. नैवैद्य अर्पण करावा. यामुळे धनलाभाचे योग निर्माण होतात आणि खर्चावर नियंत्रण मिळू शकतं.

गरजूंना हिरव्या रंगाचे वस्त्र

बुधवारच्या दिवशी गरजूला हिरव्या रंगाचे वस्त्र, बांगड्या किंवा इतर वस्तूंचं दान करा. या उपायाने आर्थिक अडचणी कमी होतात आणि घरात लक्ष्मीचे वास्तव्य वाढण्यास मदत होते. हा उपाय पैशांची चणचण असणाऱ्यांसाठी प्रभावी मानला जातो.

बुधवारचा दिवस का शुभ मानला जातो?

बुधवार हा श्रीगणेशाचा दिवस आहे आणि त्यांच्या पूजेने विघ्ने दूर होतात.

हिरवे मूग कोणाला दान करावेत?

बुधवारी गरीब व्यक्तींना हिरव्या मूगाची डाळ दान करावी, ज्यामुळे करिअरमध्ये यश मिळते.

गोशाळेत कोणते दान करावे?

हिरव्या चाऱ्याचे दान करावे, ज्यामुळे नोकरीत पदोन्नती आणि यश मिळते.

बुधवारी कोणता मंत्र जपावा?

"ॐ गं गणपतये नमः" हा मंत्र 108 वेळा जपावा, त्यामुळे नशीब बदलते.

आर्थिक संकट दूर करण्यासाठी कोणता उपाय फायदेशीर आहे?

गणपतीला हिरव्या रंगाचा नैवेद्य अर्पण करणे आणि गरजूला हिरवे वस्त्र देणे धनलाभासाठी फायदेशीर आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : २८ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीला अटक; धक्कादायक कारण समोर

Maharashtra Live News Update: पुणे जिल्हा दूध संघाकडून गाय दूध खरेदी दरात एक रुपयांची वाढ

Beed News: बीडचं बिहार होतंय? मित्रानेच मित्राची बोट छाटली

Ladki Bahin Yojana: 42 लाख लाडक्या बहिणी अपात्र,अपात्र लाभार्थ्यांकडून 6800 कोटींची वसुली होणार?

Malegaon Bomb Blast: मालेगाव बॉम्बस्फोट नेमका कुणी घडवला?मालेगाव बॉम्बस्फोट, सर्व आरोपी निर्दोष

SCROLL FOR NEXT