German Language Training Saam TV
लाईफस्टाईल

German Language Training : जर्मनीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; मुंबईतील 15 केंद्रांवर मिळणार जर्मन भाषेचे प्रशिक्षण

German Language Training: मुंबईमध्ये 15 केंद्रांवर जर्मन भाषा शिकवण्यास सुरुवात केली जाणार आहे. मुंबई प्रादेशिक विद्या प्राधिकरणच्या प्राचार्य मनीषा पवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत याबद्दल माहिती दिली.

Ruchika Jadhav

महाराष्ट्रातील होतकरू तरुणांना जर्मनीत रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. जर्मनीत नोकरी करायची म्हणजे जर्मन भाषा येणे महत्वाचं आहे. अनेक तरुणांना ही भाषा येत नाही, त्यामुळे तरुणांची हिच अडचण लक्षात घेता शालेय शिक्षण विभागाने मुंबईमध्ये 15 केंद्रांवर जर्मन भाषा शिकवण्यास सुरुवात केली आहे. मुंबई प्रादेशिक विद्या प्राधिकरणच्या प्राचार्य मनीषा पवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत याबद्दल माहिती दिली.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, राज्य शासनाने कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी जर्मनीतील बाडेन वुटेनबर्ग राज्यासोबत एक करार केला आहे. त्यचानुसार बाडेन वुटेनबर्ग येथे विविध 30 प्रकारच्या क्षेत्रांमध्ये सध्या रोजगाराची संधी उपलब्ध आहे.

त्यासाठी जर्मन भाषेचं प्रमाणपत्र आवश्यक असल्याने ते प्रशिक्षण गोथ्ये या जर्मनीतील प्राधिकृत संस्थेमार्फत देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाचा राज्यातील तरुणांनी लाभ घ्यावा. तसेच यासाठी नोंदणी करावी असं आवाहन राज्य शासनामार्फत करण्यात आलं आहे.

नोंदणी कशी आणि कुठे करावी?

या प्रशिक्षणाकरिता नोंदणी करण्यासाठी, https://www.maa.ac.in/GermanyEmployment/ या संकेतस्थळाला भेट द्या. पुढे दिलेल्या सूचना फॉलो केल्यावर तुम्ही फॉर्म भरू शकता. फक्त विद्यार्थिच नाही तर ज्या शिक्षकांना जर्मन भाषा शिकवता येते, त्यांनी सुद्धा आपली नोंदणी केली पाहिजे, असंही आवाहन शासनाने केलं आहे.

प्रशिक्षण नेमकं कुठे मिळणार?

1. श्रीराम वेल्फेअर सोसायटी हायस्कूल, अंधेरी पश्चिम

2. आई.इ.एस. न्यू इंग्लिश स्कूल, वांद्रे पूर्व

3. पार्ले टिळक विद्यालय, विलेपार्ले पूर्व

4. वेसावा विद्यामंदिर, अंधेरी पूर्व

5. शेठ चुनीलाल दामोदरदास बर्फीवाला हायस्कूल, अंधेरी पश्चिम

6. सेंट कोलंबा स्कूल, ग्रँड रोड

7. डी.एस. हायस्कूल, सायन पश्चिम

8. वालीराम बेहरूमल मेलवाणी मॉडेल हायस्कूल, ग्रँड रोड पश्चिम

9. अहिल्या विद्यामंदिर, काळाचौकी

10. एस.एस.एम.एम.सी.एम. गर्ल्स हायस्कूल, काळाचौकी

11. ओ.एल.पी.एस. हायस्कूल, चेंबूर

12. वाणी विद्यालय हायस्कूल, मुलुंड पश्चिम

13.पंत वालावलकर माध्यमिक विद्यालय, कुर्ला पूर्व

14.शेठ धनजी देवशी राष्ट्रीय शाळा, घाटकोपर पूर्व

15 संदेश विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, विक्रोळी पूर्व.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SCROLL FOR NEXT