Mithun Rashi 2024 Saam Tv
लाईफस्टाईल

Mithun Rashi 2024 : मिथुन राशीच्या लोकांना करावा लागेल अडचणींचा सामना, नवीन वर्षात आयुष्यात होतील मोठे बदल; मेहनतीचे फळही मिळेल

Gemini Horoscope 2024 : हे वर्ष मिथुन राशीसाठी अतिशय प्रभावशाली ठरणार आहे. वर्षाच्या सुरुवातीला ग्रहांची स्थिती पाहिली तर मंगळासह सूर्य सातव्या भावात भौमादित्य योग निर्माण होत आहे. जाणून घेऊया कसे असेल वृषभ राशीसाठी नवीन वर्ष.

कोमल दामुद्रे

Mithun Rashibhavishya In Marathi 2024 :

नवीन वर्ष सुरु होण्यापूर्वी ते कसे असेल असा प्रश्न अनेकांना पडतो. ज्योतिषशास्रानुसार प्रत्येक ग्रहाची स्थिती ही बदलत असते. त्यामुळे त्याचे शुभ व अशुभ फले आपल्याला पाहायला मिळतात.

हे वर्ष मिथुन राशीसाठी अतिशय प्रभावशाली ठरणार आहे. वर्षाच्या सुरुवातीला ग्रहांची स्थिती पाहिली तर मंगळासह सूर्य सातव्या भावात भौमादित्य योग निर्माण होत आहे. जाणून घेऊया कसे असेल मिथुन राशीसाठी नवीन वर्ष. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वर्षाच्या सुरुवातीला ग्रहस्थितीच्या आधारावर पाहिल्यास मिथुन राशीच्या लोकांना आरोग्याच्या (Health) अडचणींचा सामना करावा लागेल. मनोबल कमी असेल. आरोग्याच्या दृष्टिकोनातून संसर्गजन्य आजार (Disease), त्वचेची अॅलर्जी, संक्रमण होण्याची शक्यता आहे. पोट आणि पायाच्या समस्या, दुखापत, दातांच्या-डोळ्यांच्या समस्यांना सामोरे जावे लागले.

पैसा आणि नफाच्या दृष्टिकोनातून हे वर्ष अधिक फायदेशीर ठरणार आहे. उत्पन्नात वाढ होईल. दैनंदिन रोजगारातही वाढ होण्याची शक्यता आहे. धनप्राप्तीसोबतच सामाजिक वर्तुळातही वाढ होण्याची शक्यता. टेक संबंधित काम करणाऱ्या लोकांसाठी हे वर्ष अधिक फायदेशीर ठरणार आहे.

शौर्यामध्ये वाढ होईल. काही गोष्टींपासून भरकटू शकता. अभ्यासाच्या दृष्टिकोनातून हे वर्ष मध्यम फळ देईल. नवीन पदवी घेण्यासोबतच नवीन क्षेत्रही निवडाल. मुलांबाबत काळजी वाटेल. वैवाहिक जीवन चांगले राहिल. रागावर नियंत्रण ठेवा. वडिलांचे आरोग्य उत्तम राहिल. कामात यश मिळेल.

जोडीदाराकडून (Partner) लाभ होईल. जास्त राग आल्याने नात्यात दूरावा येईल. तणावाची परिस्थिती उद्भवू शकते. सरकरी क्षेत्रात प्रयत्न केल्यास यश मिळू शकते. प्रेमसंबंधात तणाव निर्माण होतील. आनंदाच्या दृष्टिकोनातून हे वर्ष नकारात्मक असेल. घरात तणावाची स्थिती निर्माण होईल. आरोग्याची काळजी घ्या. वेळीच काळजी घेतल्यास पैसा, उत्पन्न, नोकरी, व्यवसाय या दृष्टिकोनातून हे वर्ष यशस्वी ठरेल.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Blood Sugar: रक्तातली साखर वाढली? मग पायांचीही घ्या विशेष काळजी, अन्यथा...

Maharashtra Live News Update: केंद्र सरकारचे बजेट हे अत्यंत निराशाजनक आणि हास्यास्पद - यशोमती ठाकूर

Shocking : प्रसिद्ध बिल्डरने स्वत:वर गोळ्या झाडल्या; 4 दिवसांवर होतं लेकीचं लग्न

Rohit Shetty House Firing: रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार कुणी केला? संशयितांची नावं आली समोर; घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद

Ajit Pawar Death: अजित पवारांच्या विमानाचा अपघात कसा झाला? नेमकं काय घडलं होतं? तपासातून सत्य येणार समोर

SCROLL FOR NEXT