गौतम अदानींची संपत्ती...वाढता वाढता - Saam TV
लाईफस्टाईल

गौतम अदानींची संपत्ती...वाढता वाढता वाढे!

उद्योगपती गौतम अदानी यांची संपत्ती दिवसेंदिवस वाढत आहे. ब्लूमबर्ग बिलीनिअर्स इंडेक्सच्या अहवालानुसार या वर्षीच्या जानेवारी ते मार्च महिन्याच्या दरम्यान अदानींची संपत्ती २१.१ बिलियन डॉलर इतकी वाढली

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : उद्योगपती गौतम अदानी यांची संपत्ती दिवसेंदिवस वाढत आहे. ब्लूमबर्ग बिलीनिअर्स इंडेक्सच्या अहवालानुसार या वर्षीच्या जानेवारी ते मार्च महिन्याच्या दरम्यान अदानींची संपत्ती २१.१ बिलियन डॉलर इतकी वाढली. या तीन महिन्यांत गौतम अदानी यांची संपत्ती जितकी वाढली तितकी जगातील पहिल्या दहा श्रीमंत उद्योगपतींचीसुद्धा वाढली नाही. (Gautam Adani Wealth increasing Day by Day)

गौतम अदानी (Gautam Adani) यांचे टोटल नेटवर्थ ९७.६ बिलीयन डॉलरवर पोहोचले आहे. त्यामुळे अदानी आता जगातील अकराव्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती बनले आहेत; तर आशिया आणि भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती बनले आहेत. गेल्या वर्षी काही महिन्यांत अदानींनी मुकेश अंबानी यांनाही मागे टाकले होते. आता या दोन उद्योगपतींच्या संपत्तीमध्ये थोडासा फरक उरला आहे.


या तीन महिन्यांत मुकेश अंबानी यांची संपत्ती ८.२४ बिलीयन डॉलर इतकी वाढली. मुकेश अंबानी यांच्याजवळ ९८.२ बिलीयन डॉलरचे नेटवर्थ आहे. ३१ मार्च २०२२ च्या आकडेवारीनुसार मुकेश अंबानी यांच्याजवळ गौतम अदानी यांच्यापेक्षा ६ मिलीयन डॉलर अधिक संपत्ती आहे. पण काही काळातच अदानी अंबानी यांच्यापुढे निघून जातील, असे उद्योग क्षेत्रातील जाणकार सांगत आहेत.

Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Local Body Election: उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Maharashtra Politics: राजकरणात हादरा! 2 डिसेंबरनंतर महायुती तुटणार?

दुसरं लग्न थेट गुन्हा ठरणार, तब्बल 10 वर्षांचा तुरुंगवास

Maharashtra Politics: वाजलं म्हणून महायुतीचं लगेच काही तुटत नाही…|VIDEO

Kobbari Mithai: काहीतरी गोड खाण्याची इच्छा होतेय? मग खोबऱ्याची ही डीश बनवा घरीच, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT