लाईफस्टाईल

Friendship Day 2025: नातं मैत्रीचं! फ्रेंडशिप डे निमित्त तुमच्या जिवलग मित्र/मैत्रिणींना पाठवा Quotes आणि Wishes

Marathi Friendship Quotes: फ्रेंडशिप डे निमित्त तुमच्या जिवलग मित्रांना खास मराठी Quotes आणि Wishes पाठवा. या प्रेमळ संदेशांद्वारे तुमची खरी मैत्री अधिक मजबूत होईल. आनंदाच्या आणि भावनांनी भरलेल्या या क्षणांचे सेलिब्रेशन करा.

Dhanshri Shintre

मैत्री हे नातं जीवनातील सर्वांत सुंदर आणि हृदयाशी जुळलेलं असतं. नात्यात रक्ताचं नसलं तरी भावनांची नाळ असते. असे काही जिवलग मित्र असतात जे आनंदात सोबत हसतात आणि दुःखात खांद्याला खांदा लावून उभे राहतात. मायेने, समजुतीने जोडलेलं हे नातं अनेकांच्या आयुष्याला जगण्याची नवी प्रेरणा देते.

मैत्रीच्या या अनमोल नात्याचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी ऑगस्टच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. संकटात साथ देणारा आणि अंधारात प्रकाशासारखा वाटणारा खरा मित्र आयुष्याला खरी साथ देतो. त्यामुळे या फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने तुमच्या जिवलग मित्राला प्रेमाने खास संदेश पाठवा आणि त्याच्या मायेबद्दल आभार व्यक्त करा.

रक्ताची नसूनही रक्तात भिनते ती मैत्री

मैत्री दिनाच्या शुभेच्छा!

एकमेकांना भेटण्याची दोघांना आस आहे

आपल्या मैत्रीमध्ये काही तरी खास आहे

मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

साथ दिलीस दुःखात तू

हसवलंस प्रत्येक क्षणी तू

हृदयात कायम आहेस तू

प्रेमळ माझा मित्र तू

मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मन मोकळेपणाने आपण ज्याच्याकडे बोलू शकतो,

रागावू शकतो, आपलं मन हलकं करू शकतो,

ती म्हणजे जिवलग मैत्री…

मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

ना पैसा हवा ना मानपान,

दोस्ती हीच आपली जन्मभराची शान...

मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Phone battery: प्रत्येकवेळी मोबाईल 100% चार्ज करणं योग्य आहे का?

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

SCROLL FOR NEXT