Urine Pressure Water Drink Healthy liffestyle News  AI image
लाईफस्टाईल

Health Care : पाणी प्यायल्यानंतर लगेच लघवीला जावे लागते? शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी दिवसभर किती पाणी प्यावे?

Dehydration Urine Healthy Life Tips : पाणी प्यायल्यानंतर वारंवार लघवीला जावे लागते का? जाणून घ्या यामागची संभाव्य कारणे, शरीर हायड्रेट ठेवण्याचे उपाय, योग्य पाणी पिण्याची पद्धत आणि डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा.

Alisha Khedekar

सध्या तापमानात सारखे बदल जाणवत आहेत. कधी पाऊस, कधी थंडी तर कधी उकाडा. अशा संमिश्र वातावरणात शरीर हायड्रेट ठेवणं गरजेचं आहे. यासाठी दिवसभर पाणी पिणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. मात्र पाणी प्यायल्यावर सतत लघवीला जावं लागत असेल तर काही प्रमाणात ही धोक्याची घंटा ठरू शकते. मग शरीरातील पाणीपातळी योग्य ठेवण्यासाठी काय करावे? याबाबत तज्ज्ञांनी महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

आपण पाणी प्यायल्यानंतर ते पचनसंस्थेतून शरीरात शोषले जाते. त्यानंतर किडनी रक्तातील अतिरिक्त पाणी आणि टाकाऊ पदार्थ फिल्टर करून लघवी तयार करते. मात्र, पाणी प्यायल्यानंतर लगेच लघवीला जावे लागत असेल, तर त्याचे कारण आधीपासून मूत्राशयात जमा झालेले लघवीचे प्रमाणही असू शकते. याशिवाय चहा, कॉफी किंवा कॅफिनयुक्त पेये जास्त प्रमाणात घेतल्यास लघवीचे प्रमाण वाढू शकते. थंडीचे वातावरण, काही औषधे यामागे कारणीभूत असू शकते.

शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी दिवसभर थोड्या-थोड्या वेळाने पाणी पिण्याची सवय लावा. तहान लागल्यानंतरच पाणी पिण्याऐवजी नियमित अंतराने पाणी प्या. उन्हात काम करताना, व्यायाम करताना किंवा जास्त घाम येत असल्यास पाण्याचे प्रमाण वाढवा. कलिंगड, काकडी, संत्री यांसारख्या पाण्याचे प्रमाण जास्त असलेल्या फळांचा आणि भाज्यांचा आहारात समावेश करा. तसेच चहा-कॉफीचे अतिसेवन टाळा. लघवीचा रंग फिकट पिवळा असणे हे शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य असल्याचे एक सामान्य लक्षण मानले जाते.

वारंवार लघवीला जाणे, रात्री अनेकदा लघवीसाठी उठावे लागणे, लघवी करताना जळजळ होणे, खूप तहान लागणे किंवा अचानक वजन कमी होणे अशी लक्षणे दिसत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. लक्षात ठेवा, शरीराला आवश्यक तेवढे पाणी मिळणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे लघवीला जावे लागते म्हणून पाणी पिणे कमी करू नका. आपल्या शरीराच्या गरजेनुसार पाणी पिण्याची सवय लावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eye Care: डोळ्यांखालची काळी वर्तुळं कायमची गायब होतील; हे १५ घरगुती उपाय एकदा करूनच बघा

RBI Plastic Notes : खिशातील १० आणि २० रुपयांच्या नोटा बदलणार? RBI चा मोठा प्लान समोर

Oral Cancer Symptoms: तोंडात जखम नाही, गाठही नाही; तरीही होऊ शकतो कॅन्सरचा धोका! सुपारी खाणाऱ्यांनी ही लक्षणं ओळखा

Israel Elections: इस्रायलमध्ये राजकारण तापलं, निवडणुकीत पैसे वाटून मतं मिळवली; 'मोसाद' चौकशी करणार

Night Skin Care : वय कमी, पण चेहऱ्यावरून दिसता म्हातारे; रात्रीच्या ३ चुका ठरताहेत कारणीभूत

SCROLL FOR NEXT