लाईफस्टाईल

Farting problems: वारंवार पोटातून गॅस सोडण्याची समस्या जाणवतेय? सामान्य समजू नका, 'या' आजारांचा असेल धोका

Farting problems: आजकाल अनेकांना गॅसेसची समस्या जाणवते. मात्र तुम्हाला वारंवार हा त्रास होत असेल तर वेळीच लक्ष द्यावं लागणार आहे. यामागे काही आजारांचा धोका असू शकतो.

Surabhi Jayashree Jagdish

शरीरातून गॅस बाहेर सोडणं ही एक सामान्य प्रक्रिया आहे. मात्र जर सतत तुम्हाला गॅस होत असेल आणि तुम्ही वारंवार गॅस सोडत असाल तर या स्थितीकडे दुर्लक्ष करू नये. खाताना आणि पितानाही हवा पोटात जाते. मग पचनाच्या वेळी ही हवा वायूमध्ये बदलते. हा वायू आपल्या शरीरातून गुदद्वारातून बाहेर पडतो, ज्याला आपण गॅस सोडणं म्हणतो.

अधूनमधून गॅस सोडणं खूप सामान्य आहे. जर तुम्हाला वारंवार गॅस सोडत असाल तर या चिन्हाकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. कारण या गोष्टी काही आजारांचं लक्षण असू शकतं.

पचन कार्यात बिघाड

पचनसंस्था ही आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे. ज्यावेळी या कार्यामध्ये बिघाड होतो तेव्हा गॅस सोडण्याची प्रक्रिया वारंवार होते. पचनसंस्थेतील बिघाडामुळे आतड्यांमध्ये अन्न पूर्णपणे पचत नाही. मग अन्न हळूहळू कुजायला लागते. यामुळे पोटात जास्त गॅस तयार होऊ लागतो.

बद्धकोष्ठतेची समस्या

जर तुम्हाला बऱ्याच काळापासून बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल, तर या परिस्थितीत तुम्हाला वारंवार गॅस सोडण्याची समस्या येऊ शकते. बद्धकोष्ठतेमुळे पोटात जास्त गॅस तयार होतो. जर तुम्हाला बद्धकोष्ठता असेल तर तुमच्या गॅसला दुर्गंधी येऊ शकते. दीर्घकाळापासून असलेल्या बद्धकोष्ठतेच्या समस्येकडे अजिबात दुर्लक्ष करू नये.

यकृताच्या समस्या

यकृताचा आजार असल्याने वारंवार गॅसची समस्या देखील उद्भवू शकते. ज्यावेळी लिव्हरचा आजार होतो तेव्हा आतड्यांमध्ये बॅक्टेरिया वाढू लागतात. या आजारात, पाचक रसांचा स्राव देखील कमी होतो. यामुळे गॅस तयार होऊ शकतो.

इरिटेबल बोवेल सिंड्रोम

वारंवार गॅस होणं होण्याचं एक कारण म्हणजे इरिटेबल बोवेल सिंड्रोम किंवा आयबीएस. इरिटेबल बोवेल सिंड्रोममुळे आतड्यांमध्ये वायू तयार होतो. परिणामी आतड्यांमधील स्नायूंमध्ये आकुंचन निर्माण होतं.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Garba Bindi Designs : गरब्यात सगळ्यांची नजर फक्त तुमच्यावरच! ट्राय करा 'या' ७ ट्रेंडी बिंदी डिझाइन्स

Maharashtra News Live Update: लंडनमध्ये युवराज खोपडे यांचा कुस्तीचा डंका

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅकआधी शरीर देतं हे ७ संकेत, जाणून घ्या

Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त, १० तोळा ३३०० रुपयांनी घसरले; वाचा 18k- 22k आणि 18k चे दर

किचनमध्ये रोज होणाऱ्या ७ चुका, ज्या प्रत्येक महिलेने आवर्जून टाळाव्यात; आरोग्यावर होतात गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT