Free WIFI Saam Tv
लाईफस्टाईल

Free WIFI : तुम्हाला देखील Free WIFI वापरायची सवय आहे ? 'ही' चुक करु नका अन्यथा, मिनिटात होईल तुमचे बँक अकाउंट !

जर तुम्ही फ्री वायफाय वापरत असाल तर तुम्हाला फार सावध राहण्याची गरज आहे.

कोमल दामुद्रे

Free WIFI : आपल्यापैकी अनेकांना फ्री वायफाय वापरण्याची सवय असते. हा फ्री वायफाय एकतर रेल्वे स्टेशन किंवा काही पब्लिक जागेवर आढळून येतो. आपला वायफाय त्याला सहज कनेक्ट करुन आपण त्याचा वापर करतो. परंतु, त्याचा वापर करणे योग्य आहे का ? हा प्रश्न तुम्हा आम्हा सर्वांनाच आहे.

जर तुम्ही फ्री वायफाय वापरत असाल तर तुम्हाला फार सावध राहण्याची गरज आहे. कारण तुमची एक चूक तुम्हाला महागात पडू शकते. तसेच, तुमचे बँक खाते देखील रिकामे असू शकते. तुम्हीही सार्वजनिक वायफाय वापरत असाल तर चुकूनही अशी चूक करू नका. चला तर मग जाणून घ्या तुम्ही अशी कोणती चूक करत आहात ज्याची तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागेल

पब्लिक वायफाय हे एक साधन आहे जे तुमच्या बँक खात्याची सर्व माहिती चोरू शकते. आम्ही तुम्हाला आधीच सांगतो की सार्वजनिक वायफाय अजिबात सुरक्षित नाही. त्याच्या मदतीने हॅकर्स बँक खात्याची माहिती मिळवू शकतात. आजकाल सरकारकडून मोफत वायफायची सुविधाही दिली जात आहे. असे वायफाय देखील सुरक्षित असल्याचे सिद्ध होत नाही. (Free Wifi Warning May Be Harmful Bank Account Get Zero)

1. रेल्वे स्थानकावर मोफत वायफाय

रेल्वे (Railway) स्टेशन किंवा मेट्रो स्टेशनपर्यंत मोफत वाय-फाय सुविधाही देण्यात येत आहे. तुम्हाला हवे असल्यास येथून तुम्ही इंटरनेटचा वापर करता. येथे तुम्हाला कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत, परंतु ते सुरक्षिततेच्या दृष्टीने अजिबात सुरक्षित असल्याचे सिद्ध होत नाही. कारण ते वापरकर्त्यांची माहिती विना परवानगी मिळवू शकतात. येथे उपलब्ध असलेली वायफाय सुविधा केवळ एका खाजगी कंपनीने दिली आहे जी ती नंतर वापरू शकते.

Bank Fraud

2. मोबाईल वायफाय हॅक करू शकतो

वायफाय वापरून मोबाईल (Mobile) फोनही हॅक केला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत, जेव्हाही तुम्ही वायफाय कनेक्ट कराल तेव्हा प्रथम त्याच्या नियम आणि अटींबद्दल माहिती मिळवणे खूप महत्वाचे आहे. वायफाय कनेक्ट केल्यावर आयफोन सहसा सूचना देखील देतो. कंपनी वायफाय कनेक्ट करताना हा इशारा दिला जातो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sansad Ratna Award 2025 : महाराष्ट्रातील ७ खासदारांनी दिल्लीत नाव गाजवलं; सुप्रिया सुळे, वर्षा गायकवाड यांच्यासह निशिकांत दुबेंनाही संसदरत्न पुरस्कार

Best Indian Patriotic Movies: या विकेंडला बघा देशभक्ती जागवणारे हे ७ चित्रपट

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातील काँग्रेस कमिटीमध्ये काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा

Jasprit Bumrah Retirement : टीम इंडियाला मोठा हादरा! जसप्रीत बुमराह कसोटीतून निवृत्ती घेणार?

Nashik Food : नाशिकच्या Top 7 डीशेस ज्या पाहताच तोंडाला सुटेल पाणी

SCROLL FOR NEXT