Foods to avoid or limit for breakfast saam tv
लाईफस्टाईल

Morning Breakfast: सकाळच्या नाश्त्यामध्ये 'या' पदार्थांचा समावेश नकोच; लिव्हरसाठी करतात 'स्लो पॉयझन'चं काम

Foods to avoid or limit for breakfast: सकाळचा नाश्ता हा तुम्हाला दिवसभर एनर्जी देतो असं म्हणतात. मात्र तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये कोणत्या पदार्थांचा समावेश करताय हे महत्त्वाचं आहे.

Surabhi Jayashree Jagdish

आपल्या दिवसाची सुरुवात ही नाश्त्याने होते. सकाळचा ब्रेकफास्ट हा आपल्या दररोजच्या रूटीनमधला महत्त्वाचा मील मानला जातो. यामुळे संपूर्ण शरीराला दिवसभराची एनर्जी मिळते. शिवाय यामुळे मेटाबॉलिझ्म एक्टिव्ह राहतं. त्यामुळे सकाळचा नाश्ता करणं फार गरजेचं आहे. मात्र असे काही पदार्थ आहेत जे तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये खाणं योग्य नाही.

प्रोसेस्ड आणि फ्राईड फूड

अनेकांना नाश्त्यामध्ये समोसा, ब्रेड पकोडा किंवा वडापाव खाण्याची सवय असते. मात्र तळलेले स्नॅक्स खाणे यकृतासाठी हानिकारक ठरू शकतात. त्यात ट्रान्स फॅट आणि रिफाइंड तेल जास्त प्रमाणात असतं, ज्यामुळे फॅटी लिव्हरची समस्या वाढू शकते.

गोड पदार्थ

सकाळी लवकर मिठाई, केक, डोनट्स किंवा गोड पदार्थ तुम्ही खात असाल तर सावध व्हा. कारण असं केल्याने तुमच्या यकृताला हानी पोहोचू शकते. त्यात फ्रुक्टोज कॉर्न सिरप आणि साखर जास्त प्रमाणात असते. जास्त साखर खाल्ल्याने यकृतामध्ये चरबी जमा होऊ शकते.

एनर्जी ड्रिंक्स

काही लोकं सकाळी उठल्या-उठल्या एनर्जी ड्रिंक्स किंवा कोल्ड्रिंक पितात. मात्र असं कऱणं तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं. याचं कारण म्हणजे त्यात भरपूर साखर आणि कॅफिन असते. जे तुमच्या लिव्हरसाठी योग्य नाही.

अतिप्रमाणात कॉफी

सकाळी उठल्यावर अनेकांच्या हातात कॉफीचा कप असतो. कदाचित तुम्हीही असं करत असाल. रिकाम्या पोटी जास्त कॉफी पिणं तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. कॉफीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे रिकाम्या पोटी लिव्हरमधील एंजाइम्सचे असंतुलन होऊ शकते.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

Somnath Suryawanshi: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश|VIDEO

Kondhwa Girl Abused : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर अत्याचार; ५०० CCTV तपासले, पुण्यातील 'त्या' घटनेत मोठा ट्विस्ट, सेल्फी घेतलेला तरुणच...

SCROLL FOR NEXT