Flipkart Big Billion Days Sale 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Flipkart Sale 2023: फ्लिपकार्ट 'बिग बिलियन सेल डेज'चा धमाका! आयफोन मिळणार कमी किमतीत, इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर ८०% सूट

Upcoming Sale Of Flipkart : लवकरच फ्लिपकार्टचा 'बिग बिलियन सेल डे' सुरू होणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Flipkart Sale 2023

सध्या सणासुदीचे दिवस सुरू आहेत. अशातच सर्वजण काही न काही खरेदी करतात. अनेकजण नवीन सेलची वाट पाहत असतील. तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. लवकरच फ्लिपकार्टचा 'बिग बिलियन सेल डे' सुरू होणार आहे.

फ्लिपकार्ट या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर लवकरच वर्षातील सर्वात मोठा सेल सुरू होणार आहे. यासाठी त्यांनी एक मायक्रोसॉफ्टदेखील लाइव्ह केले आहे. या सेलमध्ये भरभरुन डिस्काउंट आणि ऑफर ग्राहकांना मिळणार आहे.

फ्लिपकार्टचा हा सेल 3 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. सेलमध्ये वेगवेगळ्या प्रोडक्ट्सवर जबरदस्त डिल्स मिळणार आहेत. सध्या डिलबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. एका रिपोर्टनुसार, या सेलमध्ये सॅमसंग, अॅपल आयफोन, रियलमी, पोको फोनवर जबरदस्त ऑफर मिळणार आहेत. याबाबतची सर्व माहिती 1ऑक्टोबरपासून दिली जाईल.

या सेलमध्ये ग्राहकांना भरघोस ऑफर मिळणार आहेत. 50 ते 80% टक्क्यांपर्यंत इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर सूट आहे. तर बेस्ट सेलिंग टॅब्लेट ७०% पर्यंत खरेदी केले जाऊ शकतात. किबोर्डसारख्या वस्तूंची किंमत 99 रुपयांपासून सुरू होतील. याशिवाय प्रिंटर आणि लॅपटॉपवर 60% पर्यंत सूट मिळेल.

टीव्ही आणि उपकरणांवर 80% सवलत

जर तुम्हाला टीव्ही किंवा इतर उपकरणे घ्यायचे असेल तर ही ऑफर तुमच्यासाठी सुवर्णसंधी असेल. सेलमध्ये तुम्हाला 80% सूट मिळेल. सेलमध्ये एसीवर सर्वोत्तम डिल मिळेल. याची किंमत 21,999 रुपयांपासून सुरुवात होईल. तर वॉशिंग मशीनची किंमत4,990 रुपयांपासून सुरू होणार आहे.

याचबरोबर घरातील इतर उपकरणे, किचनमधील साहित्य 299 रुपयांपासून खरेदी करु शकतात. सेलमध्ये फॅशनमध्ये कपडे, शूज अशा गोष्टींवर प्रचंड सूट दिली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Junnar leopard Attack : बिबट- माणसांच्या संघर्ष उफाळला, पुण्यात बिबट्यानं घेतला 60 जणांचा बळी; नागरिक म्हणतात गोळ्याच घाला

Gangster reels : रिलस्टार बनतायेत गँगस्टर? दहशतीच्या रिल्स बनवाल जेलमध्ये जाल, VIDEO

Latur Shocking : पुण्यानंतर लातूरमध्ये रक्तरंजित थरार; शेतात गाढ झोपलेल्या बाप-लेकाची हत्या, मृतदेह पाण्याच्या टाकीजवळ फेकले

Maharashtra Live News Update: धुळे महानगरपालिका आयुक्तांची बदली होताच ठाकरे गटाकडून जल्लोष

Maharashtra Politics: सातारा जिल्ह्यात काँग्रेसला खिंडार; माजी मुख्यमंत्र्यांचा निकटवर्तीय भाजपच्या वाटेवर

SCROLL FOR NEXT