Grah Pravesh Saam Tv
लाईफस्टाईल

Gruh Pravesh: गृह प्रवेश करायचाय? जाणून घ्या गृह प्रवेशासाठी फेब्रुवारी महिन्यातील शुभ मुहूर्त

Gruh Pravesh Auspicious Time : नवीन घरात प्रवेश करणं दे तोपर्यंत मानलं जात नाही, जोपर्यंत गृहप्रवेशाची पूजा केली जात नाही. धार्मिक शास्त्रामध्ये गृह प्रवेश करण्यासाठी नेहमी शुभ मुहूर्त, तिथी आणि नक्षत्र लक्षात घेतली पाहिजे. याच दरम्यान दोन तीन दिवसात नवीन महिना सुरू होणार आहे. या फेब्रुवारी महिन्यात गृहप्रवेशासाठी कोणते मुहूर्त आहेत, ते जाणून घेऊ..

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

February Gruh Pravesh 2024 Date:

नवीन फ्लॅट किंवा बंगल्यामधील गृह प्रवेश असो किंवा एखाद्या दुकानाचं गृह प्रवेश यासाठी आपण शुभ मुहूर्त पाहत असतो. घराची भरभराट व्हावी आणि समृद्धी मिळावी यासाठी गृहप्रवेशाची पूजा केली जाते. यामुळे योग्य मुहूर्तावर हा विधी केला गेला पाहिजे. हिंदू धर्मात कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी शुभ वेळ आणि तारीख पाहिली जाते. शुभ वेळी केले गेलेले काम दीर्घकाळापर्यंत लाभकारी असते, अशी धार्मिक मान्यता आहे. (Latest News)

गृह प्रवेशाची पूजा केल्याने घकरातील नकारात्मक शक्ती दूर जात असते. घरात एक पॉझिटीव्हीटी निर्माण होत असते. गृह प्रवेशाची पूजा न करता घरात राहणं हे अशुभ मानलं जातं.जर तुम्ही फेब्रुवारी महिन्यात नवीन घरात प्रवेश करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. या महिन्यात ६ शुभ तिथी येत असून त्यादिवशी तुम्ही गृहप्रवेश करू शकतात. ज्योतिषाचार्य अंशू पारिक यांनी माध्यमांना या मुहूर्ताची माहिती दिली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

फेब्रुवारी २०२४ मधील गृह प्रवेशाचे शुभ मुहूर्त

  • १२ फेब्रुवारी २०२४ - दुपारी ०२.५४ मिनीट ते संध्याकाळी ५.४४ मिनिटपर्यंत मुहूर्त असेल.

  • १४ फेब्रुवारी - सकाळी ७ वाजून १ मिनीट ते सकाळी १० वाजून ४३ मिनिटापर्यंत असेल.

  • १९ फेब्रवारी - सकाळी ७ वाजून ५७ मिनिटापासून ते सकाळी १० वाजून ३३ मिनिटापर्यंत असेल .

  • २४ फेब्रुवारी- सकाळी ६ वाजून ५० मिनिटापासून ते २७ फेब्रुवारी सकाळी ४ वाजून मिनिटापर्यंत असेल.

  • २६ फेब्रुवारी - सकाळी ४ वाजून १८ मिनिटांपासून ते २९ फेब्रुवारी सकाळी ६ वाजून ४७ मिनिटांपर्यंत असेल.

  • २९ फेब्रवारी - सकाळी ६ वाजून ४७ मिनिटापाससून ते सकाळी १० वाजून २२ मिनिटापर्यंत असेल.

कधी करू नये गृह प्रवेश

शास्त्रानुसार राहु काळात गृह प्रवेश कधीच करू नये. हिंदू धर्मात राहुकाळ हा अशुभ मानला जातो, त्यामुळे या काळात कोणतेही शुभ किंवा मंगल कार्य केले जात नाही. शुक्र आणि गुरू अस्त असतानाही घरात प्रवेश करण्यास मनाई आहे. भाद्र काळातही घरात प्रवेश करू नये. याशिवाय मंगळवार आणि रविवार हे गृहप्रवेशासाठी चांगले दिवस मानले जात नाहीत. प्रत्येक महिन्याचा कृष्ण पक्षातील काही काळ गृहप्रवेशासाठी चांगला मानला जातो. तर शुक्ल पक्षामधील ठराविक तारखेला गृहप्रवेश करणं योग्य असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी...' गणेश गल्ली, तेजुकाया अन्.. मुंबईतील गणरायाच्या विसर्जनाला सुरूवात

Ganpati Visarjan 2025: मुंबई ते दिल्ली गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी 'हे' आहेत शुभ मुहूर्त; जाणून घ्या सविस्तर

Ganesh Visarjan 2025: गणपती विसर्जनाच्या दिवशी चुकूनही 'या' गोष्टी करू नका; 10 दिवसांची पुजा ठरेल व्यर्थ

Anant Chaturdashi 2025 live updates : मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Maharashtra Live News Update: लक्ष्मण हाकेंविरोधात खामगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

SCROLL FOR NEXT