European Black Stork Birds in Bhandara district अभिजात घोरमारे
लाईफस्टाईल

Black stork Bird: भंडारा जिल्ह्यात युरोपीयन पाहुणे; प्रथमच अवतरले 'ब्लॅक स्टोर्क' पक्षी...

Black stork Bird: दुर्मिळ 'ब्लॅक स्टार्क' (काळा करकोचा) भंडारा जिल्ह्यात प्रथमच आढळला आहे. दुर्मिळ पट्टकादंब बदकांचे (बार हेडेड गीज) सुद्धा 5 वर्षानंतर भंडारा जिल्ह्यात आगमन.

अभिजीत घोरमारे

भंडारा: भंडारा जिल्ह्यात कार्यरत ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब (Greenfriends Nature Club, dist. Bhandara) तर्फे भंडारा - गोंदिया (Bhandara - Gondial) जिल्ह्यात मागील 20 वर्षांपासून स्थलांतरित पाणपक्ष्यांची गणना करीत असून याच पक्षी निरीक्षणातून दुर्मिळ 'ब्लॅक स्टोर्क' (Black stork - काळा करकोचा) भंडारा - गोंदिया जिल्ह्यात प्रथमच मागील वीस वर्षांच्या स्थलांतरित पक्षी निरीक्षणात आढळला आहे. हे चार दुर्मिळ काळे करकोचे भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील एका तलावात फेब्रुवारी महिन्यात अवतरले आहेत. (European Birds in Bhandara district; The black stork birds comes in bhandara)

हे देखील पहा -

या दुर्मिळ 'काळा करकोचा (ब्लॅक स्टोर्क) पक्ष्याचे मूळ वस्तीस्थान मध्य युरोपमध्ये (Europe) आहे. त्यांची लांब चोच व लांब पाय लाल रंगाचे तर पोटाचा काही पांढरा रंग वगळता इतर शरीर संपूर्ण काळ्या रंगाचे असते, याचे शास्त्रीय नाव 'सिनकोना नायग्रा' असून त्याची सरासरी लांबी 100 सेंमी. असते. युरोपमधील कडक थंडीपासून बचाव करण्याकरिता इतर स्थलांतरित बदकांसोबत हे चार काळे करकोचे भंडारा जिल्ह्यात आले आहे. यापूर्वी भंडारा जिल्ह्यात 5 वर्षांपूर्वी दुर्मिळ व्हाइट स्टार्क (पांढरा करकोचा) युरोपमधून 3 च्या संख्येने आले होते.

आता काळा करकोचा विदर्भातील काही जिल्ह्यात यापूर्वी आढळला असला तरी भंडारा- गोंदिया जिल्ह्यात प्रथमच दर्शन घडले असून यामुळे जिल्ह्याच्या पक्षीवैभवतेत अजून भर पडली आहे. सोबतच भंडारा जिल्ह्यातील दोन तलांवामध्ये 5 वर्षांनंतर पट्टकादंब अथवा राजहंस बदके (बार हेडेड गुज) 24 च्या संख्येने अवतरले असून पक्षीप्रेमींमध्ये (Bird Lovers) आनंदाची लहर पसरली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

Upvasachi Kachori: आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची कचोरी, घरीच फक्त १० बनवा

Sushil Kedia : ठाकरेंची माफी मागितल्यावर केडियाची आणखी एक पोस्ट, थेट अमित शहा यांचेच नाव घेतलं

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवारांची निवड

SCROLL FOR NEXT