English Speaking Tips SAAM TV
लाईफस्टाईल

English Speaking Tips : लहानपणापासूनच मुलं फाडफाड इंग्लिश बोलायला लागतील, पालकांनी करा 'या' साध्या गोष्टी

Children English Speaking : लहानपणापासूनच मुलांना इंग्रजी बोलण्यास प्रोत्साहन करणे हे पालकांचे कर्तव्य आहे. यासाठी पालकांनी देखील थोडी मेहनत घ्यावी. मुलांच्या उज्वल भविष्यासाठी लहान वयातच त्यांच्याशी इंग्रजीमध्ये संवाद साधा.

Shreya Maskar

इंग्रजी बोलणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे तुमच्या मुलांना इंग्रजी शिकवण्यावर भर द्या. भविष्यात समाजात टिकायचे असल्यास इंग्रजी बोलता येणे गरजेचे आहे. कारण आता इंग्रजी शिवाय एक जॉब देखील मिळणे अशक्य झाले आहे. अशा परिस्थित मोठे होऊन तुम्ही इंग्रजी शिकण्यासाठी ट्यूशन्स लावता. जे की चुकीचे आहे.

लहानपणापासून इंग्रजीचा सराव केल्यास भविष्यात तुम्ही फाडफाड इंग्लीश बोलू लागाल. मुलांना इंग्रजी शिकवण्यासाठी किंवा मुलांचे इंग्रजी सुधारण्यासाठी लिखाण, वाचन आणि ऐकणे या गोष्टी महत्वाच्या आहेत. यासाठी पालकांनी मुलांच्या लहान वयापासून इंग्रजी शिकण्यावर भर दिला पाहिजे.

इंग्रजी शब्दसंपत्ती वाढवा

तुमच्या मुलांना लहानपणापासून इंग्रजी वाचायची आणि लिहायची सवय लावा. तुम्ही स्वतः त्यांच्या सोबत इंग्रजीमध्ये बोला. त्यांची इंग्रजी शब्दसंपत्ती वाढवायला मदत करा. यासाठी पालकांनी मुलांना इंग्रजी शब्दकोश घेऊन द्या. रोज त्यातील शब्द त्यांना बोलायला , लिहायला लावा. तसेच त्या शब्दाचा अर्थ स्मरणात ठेवायला सांगा.

खेळांमधून इंग्रजीचा सराव

लहान मुलांना खेळायला खूप आवडते. तर तुम्ही खेळांमधून तुम्ही त्यांचा इंग्रजी सुधारू शकता. बाजारात अनेक इंग्रजी शिकवण्याचे खेळ उपलब्ध आहेत. याचा वापर करा. मुलांसोबत इंग्रजी शब्दकोडी सोडवा.

इंग्रजी व्याकरणावर लक्ष द्या

अनेक लहान मुलं फाडफाड इंग्रजी बोलतात. पण त्यांच्या बोलण्यात असंख्य व्याकरणाच्या चुका आढळतात. यामुळे मुलं चुकीची इंग्रजी बोलू लागतात. असा प्रकार तुमच्या मुलांसोबत होऊ नये म्हणून सर्वप्रथम इंग्रजी व्याकरण मुलांना शिकवावे. तसेच रोज लिखाणातून त्यांचा सराव करून घ्यावा.

घरात इंग्रजीचा वापर

लहान मुलं शाळेत कमी पण घरात जास्त वेळ असतात. त्यामुळे पालकांनीच घरात थोडे इंग्लीश बोलावे. कारण मुलं तुमच अनुकरण करत असतात. तसेच तुम्ही त्यांच्याशी वारंवार इंग्रजी बोलल्यावर त्यांना त्याची सवय लागेल. घरातूनच खरी भाषा शिकवली जाते. रोजच्या बोलण्यामुळे मुलं भाषा समजू लागतील.

मनोरंजनातून इंग्रजी शिकवा

लहान मुलांना कार्टून पाहायला खूप आवडते. तर तुम्ही त्यांच्यासोबत इंग्रजी कार्टून किंवा चित्रपट पाहा. त्यामुळे त्यांना छोट्या छोट्या गोष्टी कळतील. तसेच इंग्रजीमध्ये बोलायचे कसे, उच्चार कसा करावा हे समजते. तसेच यामुळे नवीन शब्द मुलांच्या कानांवर पडतील आणि त्यांची शब्दसंपदा वाढेल. तुम्ही जर रात्री झोपताना मुलांना गोष्टी सांगत असाल तर त्या इंग्रजीमधून सांगा. कारण सतत कानावर इंग्रजी पडल्याने इंग्रजी बोलण्यास मदत होते.

अभ्यासाचा इंग्रजीतून सराव

मुलांना तोंडी इंग्रजीमध्ये उत्तरे द्यायला सांगा. तसेच त्यांच्याकडून रोजचा अभ्यास इंग्रजीमधून बोलून घ्या. इंग्रजी कविता पाठांतरावर जास्त भर द्या. यामुळे कविता पाठ होण्यासोबत इंग्रजी बोलण्याचाही सराव होईल.

डिस्क्लेमर : ही फक्त सामान्य माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Morning Breakfast Recipe: नाश्त्याला दररोज मोड आलेले कडधान्ये खाल्ले तर शरीराला काय फायदा होतो?

Maharashtra News Live Update: चुकीच्या पोस्टवर सीईटी कक्ष करणार कायदेशीर कारवाई

Weather Update : पाऊस थैमान घालणार! पुढील ८ तास महत्त्वाचे; १३ राज्यांना अलर्ट जारी

Tiger Shroff: टायगर श्रॉफवर गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, २ महिलेसह चौघांना अटक; दिल्ली कनेक्शन उघड

Wednesday Horoscope : बुधवारी नशिबाची साथ, अडकलेली कामे होणार पूर्ण; कोणत्या राशींना मिळणार धनलाभ?

SCROLL FOR NEXT