High Protein Food, Protein Rich Food Veg, Protein Rich Food,
High Protein Food, Protein Rich Food Veg, Protein Rich Food,  ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

प्रोटीनचा आहारात समावेश करुन शरीरातील रक्ताची कमतरता दूर करा

कोमल दामुद्रे

मुंबई : आपले आरोग्य निरोगी राहण्यासाठी आपल्याला शरीराची विशेष काळजी घेणे अधिक गरजेचे आहे. आपण आहारात योग्य प्रथिनांचा वापर करुन शरीराची काळजी घेऊ शकतो.

हे देखील पहा -

प्रथिनांचे आहारात समावेश आहारात केल्याने शरीरसंबंधीत अनेक समस्या दूर राहण्यास मदत होते. प्रथिनांचे सेवन केल्याने आपल्या दिवसभर ऊर्जावान राहू शकते. ज्यामुळे आपले वजन कमी (Weight loss) होऊन शरीरातील रक्ताची कमतरता कमी होऊ शकते. प्रथिने अमीनो ऍसिडपासून बनलेली असतात. आपले शरीर योग्यरित्या कार्य करण्यासाठी त्याला योग्य प्रथिने आहारातून मिळणे आवश्यक आहे. आहारात योग्य प्रथिनांचा समावेश करुन आपण शरीरातील रक्ताची कमतरता दूर करु शकतो. (Protein Rich Food)

या पदार्थांचा समावेश आहारात करा-

१. शेंगदाण्यामध्ये अधिक प्रमाणात प्रथिने आढळतात. शेंगदाण्यामध्ये २० पेक्षा जास्त प्रमाणात अमीनो ऍसिड असते. याचे पुरेशा प्रमाणात सेवन केल्यास शरीराला आवश्यक असे प्रथिने मिळतात.

२. हिरव्या मूगात अधिक प्रमाणात बी - कॉम्प्लेक्स जीवनसत्त्व (Vitamins) आहे. विशेषत फोलेट आणि थायमिन असते. मुगात तांबे, लोह, मँगनीज, फॉस्फरस, कॅल्शियम आणि जस्त भरपूर प्रमाणात आढळते. यामुळे शरीरातील रक्त वाढण्यास मदत होते.

३. चणे हे प्रथिनांनी समृध्द आहे. चण्यामध्ये प्रथिन्यांचे प्रमाण १८ टक्क्यापेक्षा अधिक असते. त्यामुळे चण्याचे सेवन केल्यास रक्त वाढू शकते व शरीरातील कमजोरी दूर होईल.

४. पनीरमध्ये प्रथिन्यांसोबत कॅल्शियमही असते. यामुळे दात व हाडे मजबूत होतात. पनीरचे सेवन केल्यास रक्त वाढण्यास मदत होते तसेच पनीर अधिक घातक आजारांपासून आपल्याला लांब ठेवते. (High Protein Vegetarian Foods)

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today: आजचे राशिभविष्य, 'या' राशींच्या लोकांसाठी सोमवार ठरणार त्रासदायक; तुमची रास यात नाही ना?

Kalyan Lok Sabha: कल्याण लोकसभा मतदारसंघात राज ठाकरेंची सभा झाली तर आनंदच: श्रीकांत शिंदे

Maharashtra Politics: नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरेना? ठाकरेंच्या उमेदवाराची घौडदौड सुरुच

Maharashtra Politics 2024 : काँग्रेसचा विश्वजीत पैलवानासोबत; चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रीय

Maharashtra Politics 2024 : माढ्याच्या मैदानात फडणवीसांचा डबल धमाका; मोहिते- पवारांच्या गटात लावला सुरुंग

SCROLL FOR NEXT