WhatsApp latest News Feature, Latest Tech News in Marathi  Saam Tv
लाईफस्टाईल

WhatsApp वर मेसेज पाठवल्यानंतरही करता येणार एडिट! येतंय नवीन फिचर...

व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवल्यानंतरही तुम्ही एडिट करू शकणार आहात..

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

WhatsApp Update: व्हॉट्सअ‍ॅप युजर्सला दररोज उत्तम फीचर्स ऑफर करते आणि आता ही कंपनी अ‍ॅपच्या बीटा व्हर्जनमध्ये एडिट बटणाची टेस्ट करत आहे. सध्या व्हॉट्सअ‍ॅपवर कोणतेही एडिट बटण नाही. सध्या व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवलेले मेसेज डिलीट केले जाऊ शकतात पण एडिट केले जाऊ शकत नाहीत, पण येत्या फीचरमुळे यूजर्स पाठवल्यानंतर मेसेज एडिट करू शकणार आहेत. (Latest Tech News in Marathi)

WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅप मेसेज रिअॅक्शन फीचरनंतर आता व्हॉट्सअॅप टेक्स्ट मेसेज एडिटिंग फीचर देत आहे, जे येत्या अपडेटसह लॉन्च केले जाऊ शकते.

यावेळी, WB ने एक स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे, ज्यावर सांगण्यात आले आहे की, WhatsApp एक नवीन पर्याय डेव्हलप करत आहे. याच्या मदतीने युजर्स मेसेज पाठवल्यानंतरही झालेली चूक सुधारू शकतील, परंतु सध्या या फीचरवर काम केले जात असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे, येत्या काळात आपल्याला हे फिचर वापरता येणार आहे.
माहितीनुसार, व्हॉट्सअॅप हे फीचर सर्व अँड्रॉइड बीटा, आयओएस बीटा आणि डेस्कटॉपसाठी काम करत आहे. मात्र, या फीचरबद्दल आणखी माहिती देण्यात आलेली नाही.

हे देखील पाहा-

याशिवाय, नुकतेच मेसेजिंग अॅपवर पेमेंट फीचर सादर करण्यात आले आहे. दरम्यान, अॅपने व्हॉट्सअॅप पेमेंट्स फीचरच्या जास्तीत जास्त वापरासाठी कॅशबॅक देणे सुरू केले आहे. जे वापरकर्ते त्यांच्या मित्रांना किंवा कुटुंबियांना WhatsApp पेमेंटद्वारे पैसे पाठवतात त्यांना कंपनी 35 रुपयांचा कॅशबॅक देत आहे. महत्वाचे म्हणजे, हा कॅशबॅक फक्त तीन वेळा आणि तीन वेगवेगळ्या नंबरवर पैसे पाठवल्यास उपलब्ध असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : तोलून मापून आणि कोणत्याही घटकाला नाराज न करता काम करणे गरजेचे, अजित पवारांचा सल्ला

Trendy Blouse Design: सणासाठी साडी नेसायची असेल तर, असे ब्लाउज आत्ताच तयार करा

Diwali 2025: नरक चतुर्दशीला कारिट फळ का फोडतात? कारणे आहे खास

Liver Detox: लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी करा 'हे' सोपे उपाय, आरोग्य सुधारेल

Gulgule Recipe: नाश्त्याला काय करायचं सूचत नाही? ही गोड गुलगुल्यांची झटपट रेसिपी ट्राय करा

SCROLL FOR NEXT