Nashik News Updates, Ayurvedic Panipuri In Nashik, Ayurvedic Panipuri Benefits  Saam Tv
लाईफस्टाईल

आयुर्वेदिक पाणीपुरी खा अन् आजार पळवा!

आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करेल, अशी आयुर्वेदिक, हायजेनिक आणि चवदार पाणीपुरी तुम्हाला खायला मिळाली तर...

अभिजित सोनावणे, साम टीव्ही, नाशिक

अभिजित सोनावणे

नाशिक: पाणीपुरी म्हटलं की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटतं. मात्र गाड्यांवर मिळणारी पाणीपुरी, तिथली अस्वच्छता, खराब पाणी, पाण्यात बोटं बुडवून दिलेल्या पुऱ्या यामुळे अनेकांना पाणीपुरी खावीशी वाटत नाही. अनेकदा अशी उघड्यावरची पाणीपुरी आजारांनाही आमंत्रण देते. मात्र तुम्हाला आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करेल, अशी आयुर्वेदिक, हायजेनिक आणि चवदार पाणीपुरी तुम्हाला खायला मिळाली तर.. नाशिकच्या दत्तू शेळकेंनी हा आयुर्वेदिक पाणीपुरीचा हटके प्रयोग केलाय. (Ayurvedic Panipuri In Nashik)

नाशिकच्या राणे नगर परिसरातील खाऊगल्लीत मिळणारी ही आयुर्वेदिक पाणीपुरी.. दत्तू शेळके यांनी गेल्या पाच वर्षांपासून ही आयुर्वेदिक पाणीपुरी विकण्यास सुरुवात केलीय. पाणीपुरी हा सर्वांच्याचं आवडीचा पदार्थ असला, तरी अस्वच्छता आणि चांगल्या पाण्याच्या वापराअभावी लोक पाणीपुरी खायला टाळाटाळ करतात.  त्यामुळे 'हायजीनिक' पाणीपुरी देण्याच्या उद्देशाने बाजारात मिळणारी पाणीपुरी आणि आपल्याला हवी असलेली हायजीनिक पाणीपुरी याचा त्यांनी दोन वर्षे अभ्यास केला. आयुर्वेदिक कंपनी असलेल्या मित्राच्या मदतीने आई आणि पत्नीच्या सल्ल्याने अद्वितीय अशी 'बोट पुरी' आणि पुदिना, कोथिंबीर, आलं, जिरं, लिंबू, तुळस, शोप, आवळा, हरडा, हिंग, पिंपळी, लवंग अशा 42 नैसर्गिक पदार्थांचा वापर करून बनलेले शरीराला फायदेशीर ठरेल असे गोड आणि तिखट पाणी बनवण्यात त्यांना यश आलं.

ज्यांना झणझणीतपणा आवडतो अशांसाठी मिरचीचा ठेचा वापरलेली झोम्ब्लास्टिक पाणीपुरी डोळ्यात पाणी आणते. विशेष म्हणजे ही पाणीपुरी लॅब टेस्ट असून त्याचे सर्टिफिकेटही त्यांच्याकडे आहे. सोबतच 'बोट पुरी' आणि त्यात वापरण्यात येणारे पाणी या दोघांचं पेटंटही त्यांनी घेतलंय. शिवाय अनेक आजारांना दूर ठेवेल, अशी ही पाणीपुरी असल्याचाही त्यांचा दावा आहे.

हे देखील पहा-

गेल्या 22 वर्षांपासून पाणीपुरी आणि दाबेलीचा व्यवसाय करणाऱ्या नाशिकच्या दत्तू शेळके यांनी पाच वर्षांपासून आयुर्वेदिक पाणीपुरी विकतात. दररोज पाणीपुरी तयार करतांना गोड आणि तिखट पाण्यासाठी ते पुदिना, कोथिंबीर, आलं, जिरं, लिंबू, तुळस, शोप, आवळा, हरडा, हिंग, पिंपळी, लवंग अशा 42 नैसर्गिक पदार्थांचा वापर करतात. हे सगळं करताना पाणीपुरीची टेस्ट बदलणार नाही याचीही ते कटाक्षाने काळजी घेतात. त्यामुळे त्यांच्या या पाणीपुरीची चव आणि हायजिन यामुळे ही आयुर्वेदिक पाणीपुरी नाशिककर खवय्यांच्याही पसंतीस उतरलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ITR Filing 2026: 31 जुलैपर्यंत ITR भरला नाही तर मोठा आर्थिक फटका; प्रत्येक करदात्याने ही बातमी एकदा वाचाच

Bollywood Actress Wedding : शुभमंगल सावधान! प्रसिद्ध अभिनेत्री चढली बोहल्यावर; नवऱ्यासाठी केली खास पोस्ट, पाहा लग्नाचे PHOTOS

Maharashtra News Live Update: यंदाच्या पावसाळ्यात पंचगंगा नदी दुसऱ्यांदा पात्राबाहेर

पाण्याचा एक थेंबही न घालता बनवा कुरकुरीत 'खेकडा भजी', चव एवढी भारी की न खाणारेही खातील

Mumbai : बोगस DCP ला करायचा मदत, मुंबईत PSI ला बेड्या, चोर-पोलिसाचं बिंग असं फुटले

SCROLL FOR NEXT