Youtube Earning Saam Tv
लाईफस्टाईल

YouTube Shorts: युट्यूब शॉर्ट्सच्या माध्यमातून करा लाखो रुपयांची कमाई, फक्त फॉलो करा या 4 टिप्स

YouTube Earning : या शॉर्ट्स व्हिडिओला (Youtube Shorts) चांगले व्ह्यूज सुद्धा मिळतात. त्यामुळे पैसे कमावण्याचे हे एक चांगले साधन मानले जाते.

Priya More

How To Earn Money By Youtube: युट्यूबच्या (Youtube) माध्यमातून अनेक जण लाखो रुपयांची कमाई करतात. युट्युबवर शॉर्ट्स तयार करुन पैसे कमावण्याची क्रेझ आता वाढत चालली आहे. या शॉर्ट्स व्हिडिओला (Youtube Shorts) चांगले व्ह्यूज सुद्धा मिळतात. त्यामुळे पैसे कमावण्याचे हे एक चांगले साधन मानले जाते. पण बहुतेक लोकांना याबद्दल व्यवस्थित माहिती नसते. युट्यूबवरील इतरांचे व्हिडिओ पाहून आणि त्यातून प्रेरित होऊन अनेक जण व्हिडिओ देखील तयार करायला सुरुवात करतात. पण त्यांना यश येत नाही.

युट्युबबद्दल व्यवस्थित माहिती जाणून न घेतल्यामुळे त्यांना जास्त काळ पैसे कमवता येत नाही. तुम्ही जर युट्युबवर व्हिडिओ तयार करुन कंटाळला असाल तर तुम्ही शॉर्ट्स तयार करुन जास्त कमाई करु शकता. आज आम्ही तुम्हाला युट्युबच्या माध्यमातून अधिक पैसे कसे कमावता येतील याबद्दल जाणून घेणार आहोत. आम्ही सांगणाऱ्या टिप्सच्या माध्यमातून तुम्हाला पैसे कमावण्यात खूप मदत होणार आहे. या टिप्स नेमक्या काय आहेत ते घ्या जाणून....

वादग्रस्त मजकूर टाळा -

युट्युब शॉर्ट्सवर वादग्रस्त मजकूर अपलोड केल्याने व्हिडिओच्या द्वारे तुम्ही करणारी कमाई थांबू शकते. जर तुमच्या व्हिडिओमध्ये वादग्रस्त मजकूर सतत जात असेल तर तुमच्या व्हिडिओला जास्त लाईक्स आणि व्ह्यूज मिळणारर नाही. यातून तुमची कमाई न होण्याची दाट शक्यता आहे. जर कमाई नसेल तर तुम्ही कमाई करू शकत नाही. अशा परिस्थितीत तुम्ही कोणत्याही प्रकारचा वादग्रस्त मजकूर युट्युब शॉर्ट्सवर टाकणे टाळले पाहिजे.

व्हिडिओ टायमिंगची घ्या विशेष काळजी -

जर तुम्हाला युट्युब शॉर्टच्या माध्यमातून चांगली कमाई करायची असेल तर तुम्ही टायमिंगची काळजी घेत गरजेचे आहे. या माध्यमातून तुम्हाला जास्त कमाई करायची असेल तर तुम्ही फक्त 60 सेकंदांचा व्हिडिओ तयार करा. यापेक्षा कमी वेळेचा देखील व्हिडिओ तुम्ही तयार करु शकता.

दररोज व्हिडिओ पोस्ट करा -

यूट्यूब शॉर्ट्सचा एक महत्त्वाचा नियम म्हणजे तुम्ही त्यावर जे काही व्हिडिओ टाकता ते नियमित ठेवा. यामागचे कारण म्हणजे, जर व्हिडिओ नियमित नसतील तर तुमची एंगेजमेंट कमी होते आणि यूजर्स तुमच्या चॅनल आणि व्हिडिओंशी कनेक्ट होऊ शकत नाहीत.

ग्राफिक्स आणि अ‍ॅनिमेशन वापरा -

जर तुम्ही तुमच्या शॉर्ट्समध्ये व्हिडिओ फ्लॅट पोस्ट करत असाल तर असे करू नका. कारण यामुळे व्हिडिओची एंगेजमेंट कमी होते. अशावेळी तुम्ही ग्राफिक्स आणि अॅनिमेशन वापरा, यामुळे एंगेजमेंट वाढते आणि जास्तीत जास्त युजर्स तुमच्या अकाऊंटशी जोडले जातात. ग्राफिक्स आणि अ‍ॅनिमेशनचा वापर केल्यामुळे तुमच्या व्हिडिओंमध्ये युजर्सची आवड अधिक वाढते आणि ते तुमचे व्हिडिओ अधिकाधिक वेळ पाहतात. जर सर्वकाही व्यवस्थित केले असेल तर तुम्ही या माध्यमातून 20,000 ते 1,00,000 रुपये कमाई करु शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: 'सहाव्यांदा दक्षिण पश्चिमची जनता आशीर्वाद देणार..' देवेंद्र फडणवीसांना विश्वास

Camphor Benefits: घरात कापूर पाणी शिंपडल्याने होतात अनेक फायदे!

Aus vs Tasmania: ऐकावं ते नवल! १ धाव अन् ८ फलंदाज तंबूत; ७ फलंदाज तर शून्यावर बाद

Milid Devra News : वरळीत ठाकरे Vs देशपांडे Vs देवरा सामना रंगणार ?

Vastu Shastra : घरात या गोष्टी घडणे म्हणजे सुख, शांती आणि समृद्धीचे संकेत

SCROLL FOR NEXT