Early Symptoms of Uterine Cancer saam tv
लाईफस्टाईल

Uterine Cancer : गर्भाशयाच्या कॅन्सरच्या सुरुवातीला महिलांच्या शरीरात दिसतात 'हे' मोठे बदल, अधिकतर महिला करतात इग्नोर

Early Symptoms of Uterine Cancer : गर्भाशयात कॅन्सरची स्थिती अत्यंत गंभीर मानली असून त्याच्या लक्षणांबद्दल जाणून घेणं प्रत्येक महिलेसाठी गरजेचं आहे. गर्भाशयाचा कॅन्सर वेळीच आढळून आल्यास त्यावर उपचार होऊ शकतात.

Surabhi Jayashree Jagdish

चुकीच्या जीवनशैली आणि अयोग्य आहार यामुळे अनेक गोष्टी आपल्या मागे लागल्या आहेत. आजकाल लोकांना लहान वयातच अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागतं. यामध्ये उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, हृदयविकाराचा झटका, मधुमेह यांसारख्या समस्यांचा समावेश आहे.

यासोबत काही महिलांना गर्भाशयाशी संबंधित विविध प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. यामध्ये गर्भाशयातील कॅन्सरचाही समावेश होतो. गर्भाशयात कॅन्सरची स्थिती अत्यंत गंभीर मानली असून त्याच्या लक्षणांबद्दल जाणून घेणं प्रत्येक महिलेसाठी गरजेचं आहे. गर्भाशयाचा कॅन्सर वेळीच आढळून आल्यास त्यावर उपचार होऊ शकतात. गर्भाशयाच्या कॅन्सरची लक्षणं नेमकी काय आहेत ती जाणून घेऊया.

गर्भाशयाच्या कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे कोणती? | Early Signs and Symptoms of Uterus Cancer

ओटीपोटात दुखणं

गर्भाशयात कॅन्सरच्या सुरुवातील महिलांना ओटीपोटात तीव्र किंवा सौम्य वेदना जाणवू शकतात. अशा लक्षणांकडे जास्त काळ दुर्लक्ष करू नये. अशी लक्षणं दिसून आल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कधीकधी सामान्य कारणांमुळे ओटीपोटात वेदना देखील होऊ शकतात

पिरीयड्समध्ये अधिक प्रमाणात रक्तस्राव होणं

गर्भाशयात कॅन्सर असल्यास स्त्रियांना मासिक पाळी दरम्यान जास्त रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते. कधीकधी मासिक पाळी 5 दिवसांपेक्षा जास्त काळ टिकू शकते. जर तुम्हाला अशा प्रकारचा त्रास वारंवार होत असेल तर वेळीच तपासणी करून घ्यावी.

वारंवार स्पॉटिंग होणं

गर्भाशयात कॅन्सर असल्यास मासिक पाळी नसतानाही महिलांना रक्तस्त्राव किंवा स्पॉटिगं होऊ शकते. अशी लक्षणे दिसू लागताच ताबडतोब डॉक्टरांकडे जावं. यावर वेळीच उपचार सुरू केल्यास परिस्थिती नियंत्रणात येऊ शकते.

पांढरा स्राव

रजोनिवृत्ती म्हणजेच मेनोपॉजनंतर स्त्रियांमध्ये पांढरा स्त्राव देखील गर्भाशयात कॅन्सरचं लक्षण असू शकतं. जर लोकांनी अशा लक्षणांकडे दुर्लक्ष केलं तर ते खूप गंभीर असण्याची शक्यता आहे. या स्थितीत ताबडतोब डॉक्टरांची मदत घ्यावी.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT