Dussehra 2023 Saam tv
लाईफस्टाईल

Dussehra 2023 Muhurt: दसऱ्याच्या दिवशी दुर्लभ संयोग, शस्त्रपूजा कधी कराल? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा पद्धत

कोमल दामुद्रे

Dasara Puja Vidhi 2023 :

आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील दशमी तिथीला विजयादशमी साजरी केली जाते. दसरा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. यंदा दसरा हा सण २४ ऑक्टोबर रोजी साजरा केला जाईल.

दसऱ्याच्या दिवशी अपराजिता देवेची पूजा करुन सायंकाळी रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते. दसरा हा अर्धमावर धार्मिकतेच्या विजयाचे प्रतीक मानले जाते. हिंदू पंचागानुसार दसऱ्याचा संपूर्ण दिवस हा शुभ मानला जातो. परंतु, ज्योतिषशास्त्रात वेळेनुसार प्रत्येक ग्रह त्याची राशी बदलत असतो. ज्याचा परिणाम आपल्यावर होतो. त्यामुळे शुभ मुहूर्तांनुसार शस्त्रपूजा कधी करावी हे जाणून घेऊया ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. दसरा 2023 ची शुभ तारीख कधी आहे?

पंचांगानुसार, आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील दशमी तिथी २३ ऑक्टोबरला संध्याकाळी ५.४४ वाजता सुरू होईल आणि २४ ऑक्टोबरला दुपारी ३.१४ पर्यंत राहील. उदयतिथीनुसार 24 ऑक्टोबर रोजी दसरा सण (Festival) साजरा केला जाईल.

2. दसरा 2023 देवी अपराजिता पूजा मुहूर्त:

दसऱ्याच्या दिवशी विजय मुहूर्तावर अपराजिता देवीची पूजा करावी. यामुळे देवी अपराजिता प्रसन्न होते. अपराजिताच्या पूजेचा (Puja) शुभ मुहूर्त दुपारी ०१.५८ ते ०२.४३ पर्यंत आहे.

3. रवियोग

यंदा दसऱ्याच्या (Dussehra) शुभ मुहूर्तावर रवियोग तयार झाला आहे. त्यामुळे अपराजिता देवीची पूजा करताना रवियोगात करावी. रवियोग सकाळी ६.२७ ते दुपारी ३.२८ मिनिटांपर्यंत राहिल. तसेच संध्याकाळी ०६.३८ ते दुसऱ्या दिवशी सकाळी ०६.२८ पर्यंत रवियोग असणार आहे. दसऱ्याला अभिजित मुहूर्त हा सकाळी ११.४३ ते दुपारी १२. २८ पर्यंत राहाणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

SCROLL FOR NEXT