Side effects of green tea in Marathi, pros and cons of green tea,  ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

रिकाम्या पोटी ग्रीन टी पित असाल तर होऊ शकते नुकसान !

रिकाम्या पोटी ग्रीन टीचे सेवन केल्याने तुमच्या शरीरातील प्रोटीनची पातळी कमी होऊ शकते ज्यामुळे रक्त गोठण्यास मदत होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : वाढलेले वजन कमी (Weight loss) करण्यासाठी आपण बऱ्याच गोष्टींचा अवलंब करत असतो. आहारापासून आरोग्यापर्यंत आपण अनेक गोष्टींची काळजी (Care) घेत असतो. (pros and cons of green tea in Marathi)

हे देखील पहा -

जिममध्ये तासनतास घाम गाळून आपण विविध प्रकारचे डाएट करतो. यासोबतच, फिटनेसच्या वाढत्या क्रेझमुळे, लठ्ठपणा कमी करण्यासाठी अँटिऑक्सिडंट्स युक्त ग्रीन टी पिण्याचा ट्रेंडही हल्ली लोकांमध्ये दिसून येत आहे. वजन कमी करण्यासाठी आपल्यापैकी बरेच जण सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत अनेक वेळा ग्रीन टी पितात. ग्रीन टीमुळे आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे होत असले तरी चुकीच्या वेळी आणि चुकीच्या पद्धतीने सेवन करणे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ कोणती तिचे फायदे (Benefits) व नुकसान कोणते हे जाणून घ्या (Green tea side effects in Marathi)

या गोष्टी लक्षात ठेवा -

१. पोटदुखी होऊ शकते

ग्रीन टीमध्ये टॅनिन नावाचा पदार्थ असतो. सकाळी अनोशी पोटी ग्रीन टी प्यायल्याने आपल्या पोटातील अँसिडचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे आपल्याला पोटदुखी, उलट्या किंवा मळमळ यासारख्या समस्या होऊ शकतात.

२. अशक्तपणा येईल -

ग्रीन टीच्या सेवनाने आपली चयापचय क्रिया वाढून वजन कमी होण्यास मदत होते परंतु, जेव्हा आपण रिकाम्या पोटी ग्रीन टीचे सेवन करतो तेव्हा ती आपल्या शरीरातील लोह शोषण्याची क्षमता कमी करते. त्यामुळे शरीरात रक्त कमी होऊ शकते. त्यामुळे आपल्याला अशक्तपणा येईल.

३. रक्त गोठणे -

सकाळी रिकाम्या पोटी ग्रीन टीचे सेवन केल्याने आपल्या शरीरातील प्रोटीनची पातळी कमी होऊ शकते ज्यामुळे रक्त गोठण्यास मदत होते. अशावेळी शरीरात रक्ताच्या गाठी तयार झाल्या तर दुखापत झाल्यास रक्तस्त्राव थांबत नाही किंवा जास्त रक्तस्त्राव होतो.

४. डोकेदुखी -

सकाळी रिकाम्या पोटी ग्रीन टी प्यायल्याने दिवसभर डोकेदुखीचा आजार ग्रस्त होतो. मायग्रेनचा त्रास असणाऱ्यानी रिकाम्या पोटी ग्रीन टी वर्ज्य करावे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shravana 2025: श्रावणात शिवलिंग पूजा करताना 'या' ७ वस्तू टाळा, होऊ शकतो अपशकुन

Liver cirrhosis last stage: लिव्हर सिरोसिसच्या लास्ट स्टेजमध्ये शरीरात होतात 'हे' मोठे बदल; यकृत सडण्याची लक्षणं वेळीच ओळखा

HBD Ranveer Singh : रणवीर सिंहचं ५ सुपरहिट चित्रपट, पहिला सिनेमा कोणता?

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून अनेकांची नावे वगळली, तुमचा अर्ज बाद तर झाला नाही ना? चेक करा स्टेप बाय स्टेप

SCROLL FOR NEXT