आवळ्याचा रस त्वचेला ठरतो संजीवनी; जाणून घ्या भन्नाट फायदे Saam Tv
लाईफस्टाईल

आवळ्याचा रस त्वचेला ठरतो फायदेशिर; जाणून घ्या भन्नाट फायदे

आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, बी कॉम्प्लेक्स, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, कार्बोहायड्रेट, अँटी-ऑक्सिडंट्सचे गुणधर्म आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Amla Juice For Skin: आपण सर्व जण जाणतो की आवळ्याचा रस शरिरासाठी खुप फायदेशीर आहे. पण हे तुम्हाला माहितीये का आवळा तुमच्या त्वचेलाही हेल्दी ठेवतो. हा तुम्ही बरोबर ऐकले. आवळ्याचा रस सेवन केल्याने आपली त्वचा डाग विरहीत आणि ग्लोईंग बनते. आवळ्याचा उपयोग आयुर्वेदिक औषधांमध्ये देखील केला जातो. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, बी कॉम्प्लेक्स, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, कार्बोहायड्रेट, अँटी-ऑक्सिडंट्सचे गुणधर्म आहेत. व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए त्वचेसाठी खूप चांगले मानले जाते. रोज आवळा रस घेतल्यास आपण त्वचेला अनेक समस्यांपासून दूर ठेवू शकतो.

आवळ्यापासुन होणारे फायदे

1. त्वचेवरील डाग कमी करणे

रोज आवळा रस घेतल्याने त्वचेवरील डाग नाहीसे होतात. आवळ्यामध्ये एक असा एजंट असतो ज्यामुळे चेहर्‍यावरील डाग सहजपणे दूर होण्यास मदत होते.

2. त्वचेची जळजळ कमी करण्यासाठी

कधीकधी त्वचेमध्ये काही गोष्टी नसल्यामुळे जळजळ होण्याची समस्या उद्भवते. आवळा रस घेतल्यास त्वचेची सूज कमी होऊ शकते. कारण आवळ्यामध्ये एंटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे दाह कमी करण्यास मदत करू शकतात.

3. त्वचा मऊ करण्यासाठी

आवळा हा व्हिटॅमिन सी चा उत्तम स्रोत मानला जातो. व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात असल्यामुळे त्वचेतील कोलेजेन पेशी वाढविण्यात मदत होते. ज्यामुळे त्वचा मऊ होऊ शकते.

4. त्वचेवरील सुरकुत्यापासून बचाव करण्यासाठी

जर त्वचेवर सुरकुत्या दिसू लागल्या तर त्वचेची चमक आणि सौंदर्य कमी होते. त्वचेवरील सुरकुत्या पासून बचाव करण्यासाठी तुम्ही आवळा रस घेऊ शकता. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आढळतो ज्यामुळे सुरकुत्या दूर होण्यास मदत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : पीएम किसानचा 24वा हप्ता कधी येणार? ऑक्टोबरमध्ये खात्यात जमा होणार ₹2,000? जाणून घ्या मोठी अपडेट

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळाप्रकरणी जळगावात नाशिकच्या विशेष पथकांची धडक

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

EPFO चा मोठा निर्णय! PF Trustsना मिळणार मोठी संधी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT