धनुरासन केल्याने 'या' शारीरिक समस्या होतील दूर Saam Tv
लाईफस्टाईल

धनुरासन केल्याने 'या' शारीरिक समस्या होतील दूर

योगाभ्यासातील धनुरासन करताना आपल्या शरीराचा आकार धनुष्याप्रमाणे होत असतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

योगाभ्यासातील धनुरासन करताना आपल्या शरीराचा आकार धनुष्याप्रमाणे होत असतो. त्यामुळेच या आसनाला धनुरासन असं म्हटलं जातं. या आसनामुळे पोट, छाती यांच्याशी निगडीत समस्या दूर होतात. त्यामुळेच हे आसन कसं करावं आणि त्याचे नेमके फायदे कोणते ते जाणून घेऊयात.

हे देखील पहा -

धनुरासन करण्याचे फायदे

१. पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होते.

२. बद्धकोष्ठता, गॅस या समस्या दूर होतात.

३. भूक वाढते.

४. हातापायांना मुंग्या किंवा कंप येत असेल तो त्रास कमी होतो.

५. श्वासोच्छवासाची क्रिया सुरळीत होते.

६. पोटदुखी किंवा पोटासंबंधित तत्सम समस्या दूर होतात.

७. पचनक्रिया सुरळीत होते.

८. रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुरळीत होते.

धनुरासन कसं करावं?

१. हे आसन शक्यतो रिकाम्या पोटी करावं.

२. प्रथम पोटावर पालथं झोपा.

३. त्यानंतर पाय गुडघ्यापर्यंत फोल्ड करावेत.

४. गुडघे फोल्ड केल्यानंतर दोन्ही हातांनी पायांची बोटं किंवा पावलं पकडण्याचा प्रयत्न करावा.

५. पायाची बोटं पकडल्यानंतर श्वास घेत हळूहळू छाती जमिनीपासून वर उचलण्याचा प्रयत्न करावा.

६. छाती व मान वर उचलल्यानंतर केवळ पोटाचा स्पर्श जमिनीला होईल.

७. या स्थितीमध्ये शक्य तितका वेळ रहावं.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जोगेश्वरी पूर्वेत मातीने भरलेला डंपर बेस्ट बसवर कलंडला; महिला प्रवासी जखमी

Thane Crime : वर्गमित्रांनीच केला घात; संध्याकाळच्या वेळेला घराबाहेर बोलावलं, निर्जनस्थळी नेलं अन्... धक्कादायक कारण उघड

अभिजीत दीपके यांना जामीन मंजूर; न्यायालयानं कोणत्या ठेवल्या अटीशर्ती?

Pune : पांढरी वाळू, निळेशार पाणी अन् नारळ-सुरूची झाडं, पुण्याजवळ लपलाय 'हा' सुंदर समुद्रकिनारा

Stomach Pain: पोटदुखीला गॅस किंवा अॅसिडिटी समजून दुर्लक्ष करताय? मग शरीराने दिलेले हे गंभीर संकेत वेळीच ओळखा!

SCROLL FOR NEXT