Parenting tips, child care  ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

रात्री झोपण्यापूर्वी बाळ का रडते ? काय आहे त्यामागचे कारण जाणून घ्या

रात्री झोपण्यापूर्वी बाळ का रडते ?

कोमल दामुद्रे

मुंबई : बाळ जन्माला आल्यानंतर आई-वडील दोघेही त्याची काळजी घेत असतात परंतु, रात्र झाली की बाळ रडू लागते. बाळाला बोलता येत नसल्याने ते प्रत्येक गोष्टीत रडत असते. त्यामुळे बाळाला नेमके काय होते आहे हे आपल्याला समजत नाही.

हे देखील पहा -

बाळाला भूक लागली, थकले, आईची आठवण आले की बाळ सतत रडत असते. मुलाच्या जन्मानंतर आईला (Mother) लगेच कळते आपले बाळ का रडत आहे. त्याला कोणत्या वेळी कोणती गोष्ट हवी या सगळ्या गोष्टींचा विचार आई करत असते. परंतु, कधीकधी बाळ झोपण्यापूर्वी रडायला लागते. अशावेळी पालकांना चिंता वाटू लागते. दिवसभर बाळाची काळजी घेऊन आपण थकलेलो असतो त्यातही बाळ रडत असेल तर आपल्याला नेमके त्याच्या रडण्याचे कारण कळत नाही. अशावेळी काय करायला हवे जाणून घ्या.

१. बाळ गर्भाशयात असताना त्याला बाहेरील कोणत्याच गोष्टीची ओळख नसते. ते बाहेर आल्यानंतर त्याला सगळ्या गोष्टीची हळूहळू ओळख होऊ लागते. ३ महिन्यांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये (Child) झोपण्यापूर्वी रडण्याची लक्षण दिसून येतात. बाळाचे शरीर झोपेच्या चक्राशी जुळवून घेत असतात. शरीराची झोप प्रणाली बरोबर ठेवण्यासाठी हृदयापासून ते पचनसंस्थेपर्यंत सर्व काही काम करावे लागते.

२. बाळाला कोणताही त्रास होत असला की, तो रडून आपल्याला सांगतो. रात्री झोपताना गादी किंवा काहीतरी बाळाला त्रास देत असेल तर तो रडतो. थंडी किंवा उष्णतेमुळे मुलाला झोपेचा त्रास होऊ शकतो. त्याच वेळी, दात बाहेर पडताना रात्रीच्या वेळी वेदना अधिक होते.

३. बाळाला आपण गादीवर झोपवण्याचा प्रयत्न करतो पण त्याला आपल्या स्पर्शाची ओढ लागल्यामुळे त्याला रडू येत असते किंवा बाळ अधिक थकले असल्यावर ही त्याला रडू येते.

४. बाळ रात्री झोपण्यापूर्वी रडायला लागले, तर त्याला शांत करण्यासाठी खोलीचे वातावरण तपासून पहा. झोपताना दिवे मंद ठेवा आणि आवाज करु नका. त्याच वेळी, बाळाला झोपण्यापूर्वी त्याचे काही दुखत नाही ना हे तपासून पहा.

५. बाळाला रात्री झोपण्यापूर्वी, योग्य कपडे घालणे देखील महत्त्वाचे आहे. जर बाळ एसीमध्ये झोपत असेल तर त्याला पूर्ण बाह्यांचे कपडे घालायला लावा. याशिवाय बाळाचे कपडे आरामदायक असावेत.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT