Heart health SAAM TV
लाईफस्टाईल

Heart health: रात्री उपाशी पोटी झोपल्याने हार्ट अटॅक येतो? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

Cardiovascular disease: पुरेशी झोप न मिळाल्यास हृदय व रक्तवाहिन्यांचे आरोग्य गंभीरपणे बिघडू शकते. 7 तासांपेक्षा कमी झोप घेतल्याने रक्ताभिसरण, पेशींचे कार्य आणि हृदयविकाराचा धोका वाढण्याची शक्यता संशोधनातून स्पष्ट झाली आहे.

Surabhi Jayashree Jagdish

अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ कोलोराडो बोल्डर यांनी जर्नल ऑफ एक्स्पेरिमेंटमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात झोपेचा मानवी शरीरावर विशेषतः हृदयाच्या आरोग्यावर किती मोठा परिणाम होतो हे स्पष्ट करण्यात आलंय. या संशोधनानुसार, जे लोक दररोज रात्री किमान 7 तास झोप घेत नाहीत त्यांच्या शरीरात रक्तवाहिन्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या काही महत्त्वाच्या प्रोसेसवर परिणाम होतो. यात मायक्रो RNA आणि इतर बायोलॉजीकल घटकांच्या पातळीत बदल होऊन रक्तवाहिन्यांचं आरोग्य कमजोर होण्याची शक्यता वाढते.

दुसऱ्या एका अभ्यासात असंही आढळलंय की, जे प्रौढ व्यक्ती फक्त 6 तास झोप घेतात त्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये असलेल्या एंडोथेलियल पेशी (Endothelial Cells) योग्य पद्धतीने काम करत नाहीत. ज्यामुळे रक्ताभिसरणावर परिणाम होतो.

द हेल्थ साईटला माहिती देताना एशियन हार्ट इन्स्टिट्यूटचे वरिष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. संतोष कुमार डोरा यांनी सांगितलं की, दीर्घकाळ पुरेशी झोप न मिळाल्यास मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम दिसून येतात. यामध्ये सतर्कता कमी होणं, लहान कामांमध्ये चुका होणं, बुद्धिमत्ता आणि कार्यक्षमता कमी वाटणं, कामात लक्ष न लागणं आणि सतत चिडचिड होणं यांचा समावेश होतो. अशा व्यक्तींमध्ये ऊर्जा कमी जाणवते आणि निर्णय घेण्याची क्षमता देखील कमजोर होते.

उपाशी पोटी झोपल्यास हार्ट अटॅक येतो?

भुकेल्या पोटी झोपल्याने हार्ट अटॅक येऊ शकतो, असा दावा केला जातो. संशोधनानुसार झोपेच्या सवयी, झोपेचा कालावधी आणि रात्री उशिरा खाणं किंवा जेवण पूर्णपणे टाळणं यांचा हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. दीर्घकाळ झोपेची कमतरता राहिल्यास अपघात होण्याचा धोका वाढतो.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, झोपेची कमतरता ही हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या आजारांशी थेट संबंधित आहे. यामुळे कार्डियोव्हॅस्क्युलर आजारांचा धोका वाढतो आणि कार्डिओमेटाबोलिक सिंड्रोम होण्याची शक्यता देखील वाढते. या स्थितीमुळे लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि शरीरातील चरबी वाढणं अशा समस्या निर्माण होतात.

उपाशी झोपल्याने शरीरावर काय परिणाम होतो?

जर तुम्ही खूप वेळ काहीही न खाता झोपलात तर शरीरात काही बदल होऊ शकतात-

  • अशक्तपणा, चक्कर येणं किंवा घाम येणं अशी लक्षणं जाणवू शकतात

  • काही लोकांमध्ये हृदयाची धडधड वाढू शकते

  • रक्तातील साखर कमी होणं आणि हृदयावर ताण

  • छातीत धडधड वाढू शकते

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धक्कादायक! पायाने तुडवलेला मैदा थेट ताटात? 'त्या' व्हायरल व्हिडिओने उडाली खळबळ; FDA प्रशासनावर संताप

Maharashtra News Live Update: नंदुरबार जिल्ह्यात बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त

गोळ्या- औषधांचा खर्च वाचेल! रोज फक्त १ लवंग खाल्ल्याने शरीरात होतील ५ आश्चर्यकारक बदल

मोठी बातमी! 'टीईटी' परीक्षेत दुपट्टा, बुरखा घालण्यावर बंदी; परीक्षा परिषदेने परीक्षार्थींना काय सूचना दिल्या?

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांच्या बँक खात्यात PM किसानचा हप्ता २० जूनला जमा होणार का? महत्वाची माहिती आली समोर

SCROLL FOR NEXT