Parenting Tips, Chocolate Super Unhealthy Food Saam Tv
लाईफस्टाईल

Parenting Tips : सावधान! मुलांना शांत करण्यासाठी सतत चॉकलेट देताय? नुकसानही जाणून घ्या

Chocolate Super Unhealthy Food : बरेचदा मुले पालकांकडे हट्ट करतात अशावेळी त्यांना गप्प करण्यासाठी पालक त्यांच्या हातात चॉकेलट देतात. परंतु, डॉक्टरांनी असे करणे चुकीचे सांगितले आहे.

कोमल दामुद्रे

Chocolates Side Effects :

लहान मुलांचा सगळ्यात आवडता पदार्थ चॉकलेट. घरात येणारा पाहुणा असो किंवा आई-वडील असो लहान मुले रडू लागली की, आपण त्यांना शांत करण्यासाठी चॉकलेट देतो.

बरेचदा मुले पालकांकडे हट्ट करतात अशावेळी त्यांना गप्प करण्यासाठी पालक त्यांच्या हातात चॉकेलट देतात. परंतु, डॉक्टरांनी असे करणे चुकीचे सांगितले आहे. डॉक्टरांच्या मते मुलांना चॉकलेट (Chocolate) दिल्याने त्यांच्या आरोग्यावर (Health) परिणाम होतो. जाणून घेऊया मुलांना कसे नुकसान होते त्याविषयी

डॉक्टरांच्या मते तुम्ही चॉकलेट खरेदी करता तेव्हा तुम्ही त्याचे लेबल तपासा. चॉकलेटच्या लेबलवर साखरेचे प्रमाण ६० ग्रॅम असते. तर काही वेळेस ५४ ग्रॅम इतकी असते. अभ्यासातून असे समजून आले की, मुलांना दिवसभरात २५ ग्रॅमपेक्षा अधिक साखर (Sugar) दिली की, त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो.

1. चॉकलेट खाल्ल्याने मुलांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो?

  • जे मुले जास्त चॉकलेट खातात त्यांच्या झोपेवर परिणाम होतो. त्यांना झोपेच्या अधिक समस्या उद्भवतात.

  • चॉकलेट खाल्ल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहाते त्यामुळे त्यांना भुक लागत नाही. म्हणून ते खाणे टाळतात.

  • चॉकलेट दातांमध्ये अडकते त्यामुळे बॅक्टेरिया आणि प्लेकसारख्या समस्या होतात.

  • साखरेच्या उच्च पातळीमुळे मुलांना त्वरीत ऊर्जा मिळते. त्यामुळे ते चिडचिडे आणि आक्रमक होतात.

  • चॉकलेटचे अतिप्रमाणात सेवन केल्याने लठ्ठपणा, कोलेस्ट्रेरॉल, मधुमेह सारख्या गंभीर आजारांचा कमी वयात सामना करावा लागतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुख्यमंत्री विजय यांना पहिल्याच दिवशी मोठा धक्का; पाठिंबा देणारा मित्रपक्ष झाला नाराज, नेमकं काय घडलं?

Accident News : लग्नाला निघालेल्या दाम्पत्याचा भीषण अपघात, भरधाव पिकअपची कारला जोरदार धडक

Maharashtra News Live Update: वाढत्या तापमानाचा परिणाम चिमुकल्यांवर होत असल्याने पालकांची चिंता वाढली

Protein Foods: प्रोटीनसाठी चिकन अन् प्रोटीन पावडर कशाला? हे 5 व्हेज पदार्थ आहेत सगळ्यात बेस्ट

Sanju Rathod Success Story: ट्रेनमध्ये बसून एकट्याने गाणी ऐकली, पण आज बनला प्रसिद्ध गायक ; 'गुलाबी साडी' फेम संजू राठोडला आठवला संघर्षाचा तो काळ

SCROLL FOR NEXT