लाईफस्टाईल

Skincare Mistakes: तुम्ही पिंपल्स फोडतात का? या सवयीचा चेहऱ्यावर काय परिणाम होतो?

Pimple Popping Truth: चेहऱ्यावर मुरुम फुटवण्याची सवय हानिकारक असू शकते. यामुळे त्वचेवर जास्त डाग आणि इन्फेक्शन होऊ शकते, जे चेहऱ्याच्या सौंदर्यावर परिणाम करू शकते.

Dhanshri Shintre

उन्हाळ्यात चेहऱ्यावर पिंपल्स येणे सामान्य आहे, कारण घाम, उष्णता आणि धूळ यामुळे त्वचेवर अनेक समस्यांची वाढ होते. त्यातले एक मोठं असं मुरुमे येणे, जे चेहऱ्यावर खुणा सोडतात. हे मुरुमे त्वरित नष्ट होऊ शकत नाहीत, म्हणून अनेक लोक त्यांना फोडण्याचा प्रयत्न करतात, ज्यामुळे समस्या आणखी वाढू शकते.

जर तुम्हाला मुरुम फोडण्याची सवय असेल, तर तुम्हाला सावध राहणे आवश्यक आहे. मुरुम फुटल्यामुळे तात्पुरत्या तणावापेक्षा इतर अनेक समस्या उद्भवू शकतात. हे खरे आहे की, मुरुम एकदाच फुटला तरी त्याच्या खालून समस्या वाढू शकतात. आम्ही तुम्हाला याबद्दल अधिक माहिती देत आहोत, ज्यामुळे तुम्ही मुरुम फोडण्यापूर्वी त्याचे परिणाम विचारात घेऊ शकाल.

तुम्ही मुरुम फोडल्यास त्वचेवर संसर्ग होण्याची शक्यता वाढते. मुरुम फुटल्यानंतर त्याचे बॅक्टेरिया चेहऱ्याच्या इतर भागांमध्ये पसरतात, ज्यामुळे संसर्गाची शक्यता वाढते. यामुळे अनेक वेळा त्वचेवर इन्फेक्शन होऊ शकते, ज्यासाठी डॉक्टरकडे जाण्याची आवश्यकता पडू शकते. त्यामुळे मुरुम फोडणे टाळा.

मुरुम फोडल्यास चेहऱ्यावर त्याचे डाग राहू शकतात, जे नंतर काढणे कठीण होऊ शकते. म्हणूनच, मुरुमांवर घरगुती उपाय करून त्यांना निघून जाऊ द्या. मुरुम फोडणे टाळा, कारण ते चेहऱ्यावर चिन्ह ठेवू शकते, जे उपचारानेही पूर्णपणे काढणे कठीण होऊ शकते.

जेव्हा मुरुमे स्वतःहून निघतात, तेव्हा ते त्वचेवर कोणताही डाग किंवा समस्या सोडत नाहीत. परंतु, त्यांना स्पर्श केल्यास त्वचेचे नुकसान होऊ शकते. वारंवार मुरुम येण्यामुळे त्वचेच्या आतील थराला हानी होऊन समस्या अधिक गंभीर होऊ शकते, त्यामुळे त्यांना फोडणे टाळावे.

वारंवार मुरुमे फोडल्याने पुरळ येण्याची शक्यता असते. मुरुम फोडल्यानंतर त्यातून बाहेर पडणारा चिकट पदार्थ त्वचेच्या इतर भागांवर जमा होतो, ज्यामुळे तिथेही बॅक्टेरिया वाढतात. त्यामुळे एक मुरुम फुटल्यानंतर चेहऱ्यावर इतर मुरुम येण्याची शक्यता वाढते, आणि समस्या गंभीर होऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विहिरीत पाणी भरण्यासाठी गेली, पाय घसरला अन्.. ऐन दिवाळीत महिलेचा बुडून मृत्यू; पुण्यात खळबळ

Crime News : दारूसाठी पैसे दिले नाहीत, शेजारी संतापला, डोक्यात कुऱ्हाड घालून केली हत्या

Maharashtra Politics: दिवाळीत ठाकरेंनी बॉम्ब फोडला, नाशिकमध्ये भाजपला धक्का; २ दिग्गज नेते 'मशाल' पेटवणार

Gold Buying: धनत्रयोदशीला सोने खरेदीचा विक्रम; एकाच दिवशी 1 लाख कोटींची खरेदी

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

SCROLL FOR NEXT