Bitten By Mosquitoes Saam Tv
लाईफस्टाईल

Mosquito Bite: तुम्हाला सुध्दा इतरांपेक्षा जास्त डास चावतात का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Mosquito Bitten : डास आणि मानवांवरील अभ्यासानुसार, काही लोक डासांकडे जास्त आकर्षित होतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mosquito Bites : डास आणि मानवांवरील अभ्यासानुसार, काही लोक डासांकडे जास्त आकर्षित होतात. याचे कारण म्हणजे त्यांच्या त्वचेत असणारा एक विशेष पदार्थ. ज्याबद्दल या लेखात सांगितले आहे. उन्हाळा सुरू झाला की डासही येऊ लागतात.

काही लोक तक्रार करतात की त्यांना डासांचा जास्त त्रास होतो, ते तक्रार करतात की त्यांच्या आजूबाजूला डास (Mosquitoes) जास्त गुंजतात, तर त्यांच्या आजूबाजूच्या लोकांच्या (People) तक्रारी कमी असतात. हे खरे आहे की डास काही लोकांना जास्त त्रास देतात? की हा फक्त त्यांचा भ्रम आहे?

संशोधक काय म्हणाले?

शास्त्रज्ञांनी याबद्दल एक अभ्यास केला होता, ज्याच्या परिणामात असे दिसून आले की काही लोक खरोखरच डासांसाठी चुंबकासारखे कार्य करतात. वास्तविक, अशा लोकांच्या शरीरातून एक विशेष प्रकारचा वास येतो ज्यामुळे डास आकर्षित होतात.

या अभ्यासाने अनेक जुन्या समजुती खोडून काढल्या, ज्यात लोकांच्या रक्ताचा प्रकार, रक्तातील साखरेचे प्रमाण, लसूण किंवा केळी खाणे किंवा अगदी स्त्री असणे हे कारण मानले जात होते. सेल जर्नलमध्येही हा अभ्यास प्रकाशित झाला आहे.

कार्बोक्झिलिक ऍसिडचे आश्चर्य -

अभ्यासानुसार, ज्यांच्या त्वचेमध्ये कार्बोक्झिलिक अॅसिडचे प्रमाण जास्त असते अशा लोकांकडे डास अधिक आकर्षित होतात. संशोधकांच्या मते, मानवी त्वचेच्या फॅटी ऍसिडचा डासांना आकर्षित करण्याशी खूप जुना आणि खोल संबंध आहे. तीन वर्षांच्या अभ्यासानंतर, संशोधकांनी सहभागींना अनेक दिवस दिवसातून सहा वेळा त्यांच्या हातावर नायलॉन स्टॉकिंग्ज घालायला लावले.

या नायलॉनसह चाचणी केली असता, संशोधकांना आढळले की सहभागींमध्ये कार्बोक्झिलिक ऍसिडचे प्रमाण जास्त होते, जे डासांना आकर्षित करते. यावरून असे दिसून आले की ज्या लोकांमध्ये फॅटी अॅसिडचे प्रमाण जास्त असते, त्यांच्याकडे डास जास्त आकर्षित होतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामध्ये अज्ञात व्यक्तीने तोडले शेकडो झाडे

India vs Pakistan : पाकिस्तानची पुन्हा फटफजिती! आशिया कप जिंकल्यानंतर भारतीय महिला संघाचा नक्वींकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार

10 IPS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; महत्वाच्या शहरातील पोलीस आयुक्त बदलले, कोणाची कुठे नियुक्ती?

Kalyan Traffic Update : कल्याणमध्ये वाहतुकीत मोठा बदल! 'या' मार्गांवर निर्बंध, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Vastu Tips: घराच्या नेमप्लेटमध्ये दडलंय यशाचं रहस्य, लाकडी- दगडाची की धातूची; कोणती असते शुभ?

SCROLL FOR NEXT