Yoga Benefits For Chin Saam Tv
लाईफस्टाईल

Yoga Benefits For Chin : हा योगा करा आणि डबल चीनपासून सुटका मिळवा!

Face Yoga Benefits : वाढलेले वजन कमी करण्यासाठी आपण स्वतःची पूर्ण ताकद लावून एक्सरसाइज करतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

How To Reduce Double Chin : वाढलेले वजन कमी करण्यासाठी आपण स्वतःची पूर्ण ताकद लावून एक्सरसाइज करतो. ज्यामध्ये हेवी वर्कआउट आणि स्ट्रीक्ट डायट शामिल असते. पोट शेपमध्ये दिसण्यासाठी बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बेल्ट उपलब्ध आहेत.

अनेक व्यक्ती स्वतःचे पोट झाकण्यासाठी या बेल्टचा वापर करतात. ज्यामुळे पोटाची आणि कमरेवरची चरबी कमी करण्यास मदत मिळते. पोटावरची (Stomach) चरबी तुम्ही बेल्टच्या सहाय्याने झाकून टाकाल.

परंतु तुमचा चेहरा हा असा भाग आहे जो कोणत्याही व्यक्तीला पटकन दिसतो. अशातच तुम्हाला जर डबल चीन असेल तर, तुमचा चेहरा एवढा खास दिसत नाही. त्यामूळे डबल चीन कमी करण्यासाठी तुम्ही काय केले पाहिजे, हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरची चरबी आणि डबल चीन कमी करण्यासाठी हजार आणि लाखो रुपये खर्च करण्याची गरज नाही, यासाठी तुम्ही घरच्या घरीच उपाय करू शकता. या समस्येला फेशियल योगा (Yoga) करुन दुर केले जाऊ शकते.

बलून पोज -

तुमच्या दररोजच्या दिनचर्यामध्ये दात घासल्यानंतर गुळणा करण्यासाठी तुम्ही चूळ भरता. अगदी तश्याच प्रकारे तुम्हाला तोंडाचा फुगा करायचा आहे. यासाठी तुम्ही तुम्हाला तुमच्या तोंडामध्ये एवढी हवा भरता येत असेल तेवढी हवा भरा.

त्यानंतर तोंडामध्ये भरलेल्या हवेला डाव्या आणि उजव्या बाजूस शिफ्ट करत जा. तुम्ही हा व्यायाम दिवसातून पाच ते सात वेळा केलात तर तुमचे डबल चीन लवकरात लवकर कमी होईल. सोबतच तुमच्या जबड्याची हाडे देखिल मजबूत होतील.

फेशियल योगा वेगवेगळया पद्धतीनें केला जातो. सगळ्या प्रकारचे फेशियल योगा चेहऱ्याचे स्नायू बळकट करण्यासाठी केले जातात. हे योगा केल्याने तुमच्या चेहऱ्यावरच्या फेशियल ऍक्टिव्हिटी वाढतात आणि चेहरा सुंदर दिसतो.

फिश पोज -

या योगामध्ये तुम्ही तुमच्या दोन्ही गालांना आतल्या दिशेने घेऊन फिश पोज करू शकता. लहानपणी तुम्ही एक खेळ म्हणून अशा पद्धतीचे तोंड करत असाल. ही नक्कल आज तुम्हाला अशा पद्धतीनें कामी येऊ शकते. ही एक्सरसाइज केल्याने तुमच्या चेहऱ्यावरील संपुर्ण चरबी वितळून जाते आणि तुमच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या देखील कमी होतात.

लॉयन पोज -

या योगामध्ये तुम्ही तुमची पूर्ण ताकद लावून जीभ जेवढी बाहेर काढता येईल तेवढी बाहेर काढायची आहे. त्यानंतर तोंडामध्ये हवा भरून जीभ आजूबाजूला करायची आहे. असं केल्याने तुमच्या चेहऱ्यावरची त्वचा सुंदर बनेल. सोबतच एक्सट्रा फॅट कमी होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Sunday : घराच्या जमिनीचे आणि प्रेमाचे प्रश्न सुटणार, वाचा रविवारचे राशीभविष्य

Ind vs Eng, 5th Test, Day 3: जैस्वालचा 'यशस्वी' धमाका, जडेजा, वॉशिंगटनची 'सुंदर' खेळी, भारताचं इंग्लंडला 374 धावांचं आव्हान

Pigeons: मुंबईतील कबुतरखान्यावरून नवा वाद; नेमकं कारण काय? मुंबईत किती आहेत कबुतरखाने?

Raj Thackeray : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना हिंदीचा कळवळा; शेकापच्या मेळाव्यातून राज ठाकरेंचा हल्ला, VIDEO

Mumbai Crime : एकनाथ शिंदेंकडे तक्रार केली, तर...; 5 लाखांची खंडणी घेताना माजी नगरसेवकाला रंगेहाथ पकडलं

SCROLL FOR NEXT