Vastu tips, Do this on monday ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

धनप्राप्तीसाठी सोमवारी करा हे उपाय अन्याथा होत राहिल नुकसान

अनेक वेळा अथक परिश्रम करूनही आपल्या पैशासंबंधीच्या अडचणी दूर होत नाहीत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आपल्या कुटुंबाचे जीवन सुखी होण्यासाठी आपण खूप कष्ट करून पैसे गोळा करत असतो, पण अनेक वेळा अथक परिश्रम करूनही आपल्या पैशासंबंधीच्या अडचणी दूर होत नाहीत.

हे देखील पहा -

हिंदू धर्मात आठवड्यातील प्रत्येक दिवस हा विशिष्ट मानला जातो. प्रत्येक वारानुसार प्रत्येक देवी-देवतांचे महत्त्व सांगितले जाते. आठवड्यातील वेगवेगळ्या दिवशी केलेल्या कामाचे फळ आपल्याला आयुष्यात मिळत असते. आठवड्याचा पहिला वार हा भगवान शंकराच्या नावाने ओळखाल जातो. अशाच धार्मिक शास्त्रांमध्ये सोमवारी धनप्राप्तीबाबत काही विशेष उपाय सांगण्यात आले आहेत.

हा उपाय करुन बघा

१. सोमवार हा भगवान शंकराचा वार समजला जातो. अशी मान्यता आहे की, सोमवारी भगवान शंकराची भक्ती आणि श्रद्धेने पूजा केल्याने त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. आपण नियमितपणे भगवान शिवाची पूजा केली तर ते प्रसन्न होऊन आपल्याला अपार सुख आणि समृद्धीचा आशीर्वाद देतात.

२. आपण अथक परिश्रम करूनही आपल्याकडे पैसे (Money) टिकत नसतील तर दर सोमवारी रात्री शिवलिंगावर तुपाचा दिवा लावावा. हे नियमित केल्याने भगवान शंकराची विशेष कृपा प्राप्त होऊन आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळते.

३. आपण आपल्या कार्याच्या यशप्राप्तीसाठी प्रामाणिकपणे भगवान शंकराला प्रार्थना केली आणि तसेच शिवलिंगाला बेलची पाने, धतुरा, दूध आणि पाण्याने अभिषेक केला तर भगवान शंकर प्रसन्न होऊन आपल्या कार्यात यशस्वी होण्यासाठी आशीर्वाद देतात.

४. सोमवारी (Monday) शिवलिंगावर भगवान शंकराला मध अर्पण केल्यास भगवान शिव नोकरी किंवा व्यवसायात येणारे अडथळे दूर करतात आणि त्याला प्रगतीचा आशीर्वाद देतात.

५. आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या कुंडलीत पितृदोष असल्यामुळे आपली प्रगती थांबते किंवा आपल्याला व्यवसायात लाभ होत नाही. अशावेळी आपण सोमवारी संपूर्ण तांदूळ आणि काळे तीळ गरजू व्यक्तीला दान केल्यास पितृदोषातून मुक्ती मिळते आणि प्रगतीचा मार्ग खुला होईल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Live Update : उद्धव ठाकरेंचे नेतृत्व कधीच वादात नव्हते, कपिल सिब्बल यांचा दावा; कोर्टातील सुनावणीचे क्षणाक्षणाचे अपडेट

Baba Vanga Prediction: 5 ते 9 ऑगस्टदरम्यान 'या' 5 राशींवर होणार पैशांचा वर्षाव? पाहा तुमची रास आहे का

KDMC Hospital : KDMC रुग्णालयात शिकाऊ डॉक्टरांचा हलगर्जीपणा! इंजेक्शनची सुई चिमुकल्याच्या कमरेत अडकली; धक्कादायक सत्य समोर

Virar Local Train: धावत्या लोकलसमोर थेट रुळांवर उभा राहिला तरुण, पुढे जे घडलं ते पाहून प्रवाशांनाही बसला मोठा धक्का

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पावसाळ्यात नक्की खा 'या' 6 गावरान भाज्या

SCROLL FOR NEXT