Relationship With In Laws saam tv
लाईफस्टाईल

Relationship With In Laws: मुलीचं लग्न झाल्यानंतर जावयाला चूकुनही 'या' गोष्टी बोलू नका; नात्यामध्ये कटूता येण्याचा धोका

Relationship With In Laws: मुलीच्या पालकांचं आपल्या जावयाशी नातं खूप खास असतं. आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्या तुमच्या जावयासमोर बोलल्या जाऊ नयेत.

Surabhi Jayashree Jagdish

मुलीचं लग्न झाल्यानंतर तिच्या पालकांचं आणि जावयाचं एक खास नातं तयार होतं. मुळात लग्न हे केवळ दोन व्यक्तींचं नसून दोन कुटुंबाचं होत असल्याचं मानलं जातं. मुलीच्या पालकांचं आपल्या जावयाशी नातं खूप खास असतं. या नात्यामुळे दोन कुटुंबामध्ये देखील एक वेगळं नातं निर्माण होतं.

जावयासोबतच्या नात्यामध्ये परस्पर आदर आणि समजूतदारपणा असणं खूप महत्वाचं आहे. यामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये प्रेम टिकून राहतं. पण यावेळी अनेकदा कधी कधी नकळत मुलीच्या पालकांकडून काही गोष्टी बोलल्या जातात. ज्यामुळे नातं बिघडण्याची शक्यता असते. आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्या तुमच्या जावयासमोर बोलल्या जाऊ नयेत.

"तू आमच्या मुलीची काळजी घेतली पाहिजे"

प्रत्येक नवरा आपल्या बायकोची काळजी घेतो. पालकांना आपल्या मुलीची जबाबदारी आणि काळजी याबद्दल काळजी वाटणं स्वाभाविक आहे. पण तुमची मुलगी आता वेगळ्या कुटुंबाची सदस्य आहे हेही लक्षात ठेवलं पाहिजे. तुमच्या जावयाला तुमच्या मुलीची काळजी घेण्यास वारंवार सांगितल्यामुळे तुमचा त्याच्यावर विश्वास नाही असं वाटू शकतं.

"तुझा पगार कमी आहे"

तुमच्या जावयाच्या उत्पन्नावर किंवा तो करत असलेल्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने खूप नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. त्याचं उत्पन्न कमी असो वा जास्त, प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने मेहनत घेत असतो. असं केल्याने नात्यामध्ये दुरावा येण्याचा धोका असतो.

"तुझ्या कुटुंबाचं वागणं योग्य नाही"

सुनेच्या कुटुंबाबद्दल नकारात्मक टिप्पणी केल्याने त्यांच्यामध्ये वाद होण्याची दाट शक्यता असते. प्रत्येक कुटुंबाची स्वतःची पद्धत आणि संस्कृती असते. मुली त्यानुसार वागतात. त्यामुळे अशा परिस्थितीत मुलीच्या कुटुंबियांनी बोलू नये.

"आमची मुलगी पहिल्यांदा अशी नव्हती"

दुसऱ्या कुटुंबामध्ये गेल्यानंतर प्रत्येक मुलीच्या काही ना काही सवयी या बदलतात. जर मुलीच्या पालकांनी जावयाला असं म्हटलं तर थेट संदेश मिळतो की, सासरच्या घरी आल्याने तुमच्या मुलीच्या सवयी किंवा वागणूक बदलली आहे. अशा प्रकारच्या कमेंटमुळे नात्यात कटूता येऊ शकते.

"जायवाची कोणाशी तुलना करू नये"

तुमच्या जावयाची तुलना इतर कोणत्याही व्यक्तीशी करणं योग्य नाही. यामध्ये अनेकजण जावयाची आर्थिक स्थिती तसंच त्याच्या राहण्याची स्थिती यावरून तुलना करताना दिसतात. मात्र असं केल्याने नातेसंबंधात कटुता येऊ शकते. अशी तुलना केल्याने आत्मविश्वास कमी होऊ शकतो.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT