नात्यात सगळ्यात महत्त्वाचा असतो तो विश्वास. कोणतेही नाते हे विश्वासावर टिकते. नातं अधिक घट्ट करण्यासाठी केवळ प्रेम पुरेसे नाही, त्यात अनेक गोष्टी महत्त्वाचा असतात.
लॅव्ह मॅरेंजमध्ये जोडीदाराच्या अनेक गोष्टीपूर्वीपासून माहित असतात. परंतु, अरेंज मॅरेजमध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला समजून घ्यावा लागतात. अरेंज मॅरेजमध्ये अनोळखी व्यक्तीशी लग्न करताना आपल्याला अनेक प्रश्न पडतात. अनेकदा आपल्याकडून काही चुका होतात. ज्याचा थेट परिणाम आपल्या नात्यावर होतो. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
साखरपूडा (Engagement) आणि लग्नामधील काळ हा अधिक आनंदाचा असतो. पण यावेळी आपण न कळत अशा अनेक चुका करतो ज्याचा परिणाम आपल्या नात्यावर (Relation) होतो. जर तुमचा देखील नुकताच साखरपूडा झाला असेल तर या गोष्टी चुकूनही करु नका
1. फोनवर जास्त बोलू नका
साखरपूडा झाल्यानंतर जोडीदाराशी जास्त वेळ बोलू नका. सतत बोलण्याने तुमच्यात भांडण होऊ शकतात. त्यामुळे कमी प्रमाणात पण शक्य असल्यास बोला
2. एकमेकांचा आदर करा
कधी कधी बोलताना तुमचे मत एखाद्या गोष्टीवर जुळत नाही. त्यामुळे तुमच्या वाद होऊ शकतो. अशावेळी एकमेकांना समजून घ्या. निर्णयाचा आदर करा. तसेच एकमेकांना बद्दल अपशब्द वापरु नका.
3. जोडीदारावर हक्क गाजवू नका
लग्नापूर्वीच तुम्ही तुमच्या जोडीदारावर (Partner) हक्क गाजवत असाल तर तुमच्यात वाद होण्याची अधिक शक्यता आहे. कोणतीही गोष्ट सांगताना प्रेमाने आणि समजावून सांगा. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करु नका.
4. कुटुंबाबद्दल वाईट बोलू नका
लग्न म्हणजे दोन लोकांचे मिलन नसून दोन कुटुंबाचे मिलन असते. नात्यात आल्यानंतर एकमेकांच्या कुटुंबाबद्दल विचारपूस करा परंतु, चुकूनही एकमेकांच्या कुटुंबाबद्दल वाईट बोलू नका. एखाद्या गोष्टीवर तुमचे मत मांडा पण बळजबरीपणा करु नका
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.